Billboards nailed to trees Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : झाडांवर खिळे मारून जाहिरातींचे फलक! व्यावसायिकांवर कारवाई करावी

Mapusa News : हणजूण जैवविविधता समितीकडून तक्रार

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News : म्हापसा, पंचायत कार्यक्षेत्रातील विविध झाडांवर जाहीरात फलक खिळ्याने ठोकून तसेच तारेने बांधून झाडांची हानी करून जैवविविधतेचा र्हास करण्याचा प्रयत्न केला.

तसेच परिसराचे विद्रूपीकरण केल्यामुळे व्यावसायिकांविरुद्ध पर्यावरण रक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी तक्रार हणजूण कायसुव जैवविविधता व्यवस्थापन समितीने पोलिसात केली आहे.

या तक्रारीची प्रत हणजूण कायसुव पंचायतीला देण्यात आली आहे. या तक्रारीसोबत झाडांवर खिळे मारून जाहीरात केलेले फोटोही जोडले आहेत.

सुमारे वीस हॉटेल व्यासायिकांनी तसेच इतर व्यासायिकांनी या पंचायत क्षेत्रातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांना खिळे ठोकून आपल्या जाहिरातीचे फलक लावले होते. यामध्ये डायस पूल क्लब अँड बार, अलगा मसाज, माहे,

कोरूम, हाऊलिंग वॉल्स, पर्पल मार्टिनी, किट्टी पॉवर, वॉशिंग लॉन्ड्री, आयुर ग्लो, बिलिव्ह, जस्ट, फेलिक्स क्लब, मेक्सिकोला, गो एशियन स्पा, पाझ गोवा, कुका बुरा कॅफे, रापोसा रिसॉर्ट, कोलीना बार अँड किचन आदी आस्थापनांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT