Goa News : गोव्याच्या नावावर उत्पादने विकणाऱ्यांवर नजर : रवी नाईक

Goa News : फोंड्यात ग्राहक हक्कदिन उत्साहात, ग्राहकांना दिली उपयुक्त माहिती
goa
goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News : फोंडा, राज्यातील ग्राहकांनी सजगता बाळगण्याबरोबरच गोव्याच्या नावावर विकल्या जाणाऱ्या बाहेरील उत्पादनांवर आता सरकारची करडी नजर राहणार असल्याचा इशारा कृषीमंत्री रवी नाईक यांनी दिला.

फोंड्यात आज (गुरुवारी) राज्य सरकारच्या नागरी पुरवठा खात्यातर्फे वीज खात्याच्या सहयोगाने आयोजित राष्ट्रीय ग्राहक हक्कदिनाच्या कार्यक्रमावेळी रवी नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

फोंड्यातील ॲग्री बाजार प्रकल्पात आयोजित या विविध विषयांवरील जागृती कार्यक्रमाला जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी, कुर्टी खांडेपार सरपंच संजना नाईक तसेच राज्य सरकारचे सचिव संजित रॉड्रिगीस, वीज खात्याचे अधिकारी शैलेश बुर्ये, नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी अमित सावंत आदी उपस्थित होते.

रवी नाईक म्हणाले की, ग्राहकांनी चांगले कुठले आणि वाईट कुठले याबाबत शहानिशा करण्याची आज खरी गरज आहे. चांगल्या वस्तूच्या नावावर खराब वस्तू विकण्याचा प्रयत्न देशभर होत आहे.

गोव्यातील रूचकर काजूच्या नावाखाली बाहेरील काजू आणून पाकिटे तयार करून विकण्यात येत आहे. गोव्यातील काजू चविष्ट आहेत, मात्र बाहेरील काजूची चव वेगळी असल्याने ते ग्राहकांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे रवी नाईक म्हणाले.

संजीत रॉड्रिगीस यांनी ग्राहकांनी जागे होण्याची आवश्‍यकता व्यक्त केली. ग्राहकांना फसवण्याचे प्रकार वाढले असून ते रोखण्यासाठी ही सजगता आवश्‍यक असून त्यादृष्टीने सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहकांच्या हिताच्या अनेक बाबी त्यांनी यावेळी स्पष्ट केल्या.

शैलेश बुर्ये म्हणाले की, वीज खाते स्वयंपूर्ण होत असून भूमिगत वीजवाहिन्यांमुळे पुढील काळात सुरळीत वीजपुरवठा होण्याबरोबरच ग्राहकांना चांगले ते देण्याचा वीज खात्याचा प्रयत्न असेल असे नमूद केले.अमित सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर पूर्वा प्रभू यांनी सूत्रसंचालन केले.

goa
Goa News: डॉ. सुशीला मेंडिस यांची सेवावाढ सरकारकडून मागे

परिसंवादात झाली उपयुक्त चर्चा

या कार्यक्रमात ग्राहकांसोबत परिसंवादात ग्राहक जागृतीबाबत उपयुक्त चर्चा झाली. गोवा कॅनचे रोलंड मार्टिन्स तसेच ग्राहक मंचच्या इतर पदाधिकाऱ्यांतर्फे झालेल्या चर्चात्मक कार्यक्रमात ग्राहकांना बोलते करण्यात आले.

राज्यात ग्राहकांना अनेक समस्या भेडसावत आहेत, पण त्याविरुद्ध अवघेच आवाज उठवतात, त्यामुळे सर्वांनी जागे व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

प्लास्टिक तांदळाची अफवा...

राज्यात प्लास्टिक तांदळाची अफवा अधूनमधून पसरवली जात आहे. वास्तविक हा प्लास्टिकचा तांदुळ नव्हे तर केंद्र सरकारच्या धोरणानुसार गरीब गरजूंना प्रथिनेयुक्त तांदुळ उपलब्ध व्हावा यासाठी मशीनवर हा तांदुळ तयार केला जातो व तो पुरवला जातो, मात्र काहीजण त्याला प्लास्टिकचे तांदुळ संबोधून लोकांत संभ्रम निर्माण करतात, ते चुकीचे असल्याचे नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com