Law Minister Arjun Ram Meghwal  Dainik Gomantak
गोवा

Goa ST Reservation: आदिवासींना राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग खुला, लोकसभेत विधेयक सादर

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: लोकसभा निवडणूकपूर्व आश्वासनाची पूर्ती करताना केंद्र सरकारने आज गोव्यातील आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठीचे विधेयक लोकसभेत सादर केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत असे विधेयक सादर करण्यासाठी त्या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली होती.

राज्यातील गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाला आदिवासींचा दर्जा मिळून 23 वर्षे झाली तरी अद्याप त्यांना विधानसभेत प्रतिनिधित्व मिळालेले नाही. 40 पैकी एक मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे. विधानसभा मतदारसंघांच्या दहा टक्के म्हणजे चार मतदारसंघ आदिवासींसाठी आरक्षित ठेवले जावेत, अशी मागणी आदिवासी समाज करत आहे.

त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आंदोलनही केले होते. यामुळे राज्य सरकारने केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी सर्व पक्षीय शिष्टमंडळही दिल्लीला नेले होते.

लोकसभेत आज केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज अनुसूचित जमातींना (एसटी) आरक्षण देण्याच्या उद्देशाने एक विधेयक मांडले. 2011 च्या जनगणनेनुसार गोव्यातील आदिवासी लोकसंख्या 1 लाख 49 हजार 275 आहे व 25 हजार 449 च्या अनुसूचित जाती लोकसंख्येपेक्षा बरीच जास्त आहे.

तरीही आदिवासींसाठी कोणतीही जागा राखीव नाही आणि त्यामुळे ते आरक्षणाचा घटनात्मक लाभ घेऊ शकत नाहीत, असे या विधेयकात नमूद केले आहे. दरम्यान, पुढील जनगणनेपूर्वी अनुसूचित जाती-जमातीसाठी जागा वाटप करण्याचा सध्या निवडणूक आयोगाला अधिकार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्‍येने गोव्‍यात यावे'; गुजरातमधील परिषदेत मुख्‍यमंत्री सावंतांचे आवाहन

Cutbona Jetty: कुटबण- मोबोर येथे आणखी ४ कॉलराबाधित सापडले! 'संख्‍या १८७' वर

St Estevam Accident: बाशुदेव कडे होते रोख '१ लाख' रुपये? २३ सप्टेंबरनंतरच ‘ती’ जबाब द्यायला गोव्यात येणार

Goa Cabinet Reshuffle: पक्षश्रेष्ठी महाराष्ट्राच्या निवडणुकीत गर्क; गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना पुन्हा लांबणीवर

Goa Accidents: गोव्यात अपघातांचे सत्र सुरूच! आणखी तीन बळी; मांद्रेतील तिसऱ्या तरुणीचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT