Bilawal Bhutto India Visit
Bilawal Bhutto India Visit Dainik Gomantak
गोवा

Bilawal Bhutto India Visit: बिलावल यांचं आजोळ आणि गोव्याचं खास कनेक्शन तुम्हाला माहितीये? पाकिस्तानमध्ये आहे गोमंतकीयांची वस्ती...

Akshay Nirmale

Bilawal Bhutto India Connection: कराची हे पाकिस्तानमधील दक्षिणेकडील एक महत्वाचे शहर आणि बंदर. कराचीला बहु-सांस्कृतिक इतिहास होता. विविध भाषा, धर्म, पंथातील लोक येथे होते.

त्यामुळे पाकिस्तानच्या स्थापनेपुर्वी म्हणजेच अखंड भारतात कराची जणू मेल्टिंग पॉट होते. याच कराचीचे भारतातील गोव्याशी आणि गोव्यातील रोमन कॅथोलिक नागरिकांशी जवळचा संबंध होता.

कराचीमध्ये पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचा जन्म झाला होता. त्या नात्याने सध्या SCO बैठकीसाठी गोव्यात आलेल्या पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांचे कराची हे आजोळ आहे. जाणून घेऊया या कराची-गोवा नात्याविषयी...

(Bilawal Bhutto India Visit)

पोर्तुगीजांनी गोव्याचा ताबा घेतला तेव्हा अनेक गोवावासीय ज्यांना पोर्तुगीजांच्या ताब्यात राहायचे नव्हते ते भारताच्या इतर भागांत आणि ज्यामध्ये आत्ताचा पाकिस्तानही आहे, तिकडे निघून गेले. अनेक गोवेकर जहाजातून समुद्रामार्गे कराचीला गेले.

खरे तरं, कराची शहर उभे करण्यात अनेक गोमंतकीयांचाही हात आहे. गोवन पोर्तुगीज समुदायातील एक गट 1820 मध्ये व्यापार आणि नोकरीच्या उद्देशाने कराचीत स्थलांतरीत झाला. तेव्हा कराचीत शिपिंग व्यवसाय तेजीत होता. या उद्योगाच्या वाढीत गोवावासीयांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

1800 च्या मध्यात या शहरात पहिल्यांदा स्थलांतरित आहे. पाकिस्तानात आलेल्या अंदाजे 100,000 पैकी बहुतांश कराची येथील सद्दार, केमारी, डिसिल्वा टाउन, कॅथोलिक कॉलनी आणि कराचीतील PECHS येथे स्थायिक झाले.

पाकिस्तानमधील गोवन समुदाय प्रामुख्याने कराचीतच केंद्रित झाला. येथील ते शहरातील प्रमुख चर्चच्या आसपास शांततेत राहतात.

भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वी, कराचीमध्ये गोवन संस्कृती घट्ट रूजली होती. कराचीतील गोवन खाद्यपदार्थांच्या दुकानमालक लुसियाना फर्नांडिस म्हणतात, कालांतराने गोवन लोकसंख्या कराचीच्या अराजकात विलीन झाली.

येथे सुरू असलेल्या गोवन परंपराही बंद झाल्या. माझे वडील निकोलस ब्रिगांझा पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी जहाजाने कराचीला आले.

त्यांनी कराचीमध्ये सद्दार भागातील झाहिद निहारीजवळ एका निळ्या इमारतीत पहिले गोवन खाद्यपदार्थांचे दुकान उघडले. माझी आई रीटा ब्रिगान्झा या लहान असतानाच कराचीला आली. तिने पारशी घरात केयरटेकर म्हणून काम केले. माझा जन्म, शिक्षण कराचीतच झाले, मी एका फार्मास्युटिकल कंपनीत काम केले.

कराचीत गोवन पदार्थांचे रेस्टॉरंट

2019 मध्ये, फर्नांडिस यांनी मुलगी आणि पतीसोबत चर्चा करून कराचीत पारंपरिक गोवन पदार्थांचे रेस्टॉरंट सुरू केले. स्थानिक ख्रिश्चन आणि मुस्लिम किंगफिश मसाला, विंडालू, कोळंबी करी आणि इतर गोवन खाद्यपदार्थांचा आनंद घेण्यासाठी येथे येतात.

येथील गोवन मिठाई लोक ऑर्डर करतात. शहराच्या बाहेरूनही मिठाईसाठी ऑर्डर येतात.

सद्दार येथील जेनी डिसोझा यांनी सांगितले की, कराचीतील गोवन समुदाय आता कमी होत चालला आहे. पुढील पिढीचे लोक अधिक चांगल्या संधींच्या शोधात इतर देशांमध्ये जात आहेत. मी माझे संपूर्ण आयुष्य कराचीमध्ये गौरवशाली सोनेरी क्षणांसमवेत खूप छान लोकांसोबत घालवले आहे. पण आता इथे तरुण निराश दिसत आहेत.

माझे वडील मेकॅनिकल अभियंता होते. ते 1933 मध्ये कराचीला आले. मी सद्दार येथेच वाढले आणि स्थानिक मिशनरी शाळेत शिक्षण घेतले. तिथे गोवन समुदायातील हजारो लोक राहत होते. गोवन लोक कष्टाळू आणि सुशिक्षित होते. त्यांनी ब्रिटीश काळात बँका, शिपिंग उद्योग आणि सरकारी कार्यालयांमध्ये काम केले.

पाकिस्तानातील सुप्रसिद्ध गोवेकर

पीटर पॉल फर्नांडिस यांनी 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये फील्ड हॉकीमध्ये ब्रिटिश भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मॅन्युअल मिस्किटा 1946 मध्ये कराचीचे महापौर होते आणि अनेक गोवा कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन (KMC) मध्ये नगरसेवक होते.

कराचीमधील रस्त्यांना ब्रिट्टो रोड, पेड्रो डिसोझा रोड, डी'क्रूझ रोड, डी'अब्रेओ स्ट्रीट, नाझरेथ स्ट्रीट आणि डिसिल्वा स्ट्रीट यासह इतरही गोवन्सची नावे आहेत.

प्रसिद्ध मिस्किटा बेकरीचे नाव 1858 मध्ये गोवा समुदायातील सदस्य जे. सी. मिस्किटा यांच्या नावावरून ठेवले गेले. आणखी एक गोव्यातील सिनसिनाटस फॅबियन डी'अब्रेओ यांनी 1886 मध्ये कराची येथे ILACO (पूर्वीचे इंडियन लाइफ अॅश्युरन्स कंपनी) शोधण्यात मदत केली.

सिनसिनाटस आणि इतर अग्रगण्य गोवावासियांनीही शहराची पहिली टाउनशिप "सिनसिनाटस टाउन" 1926 मध्ये (नंतर गार्डन ईस्ट म्हटले गेले) सुरू केली.

गोवन शिक्षकांच्या जोरावरच कराचीतील बहुतेक मिशनरी शाळा सुरू होत्या. अनेक गोवावासीय न्यायव्यवस्था, नागरी सेवेत आले. अनेकजण राजकारणात आले, काही पोलिस कर्मचारी झाले, काही गुप्तचर अधिकारी झाले. काहींनी पाकिस्तानच्या सशस्त्र दलातही पदे स्वीकारली.

फाळणीनंतर कराचीतील गोवन समाज मजबूत होता, असे कराची गोवन असोसिएशनचे (KGA) व्यवस्थापक डेनिस फ्रान्सिस यांनी सांगितले. KGA मध्ये 900 पेक्षा जास्त सदस्य होते, परंतु त्यातील बहुतेकजण युरोप, ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम आणि कॅनडा येथे स्थलांतरित झाले.

धार्मिक योगदान

कराचीमध्ये आलेली बहुतेक गोवन्स हे रोमन कॅथलिक होते. येथील सेंट पॅट्रिक्स कॅथोलिक चर्च हे ख्रिस्ती समुदायासाठी एकत्र येण्याचे ठिकाण बनले. गोवन लोक सण आणि इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी येथे एकत्र येत. समुदायाने सेंट पॅट्रिक हायस्कूल सुरू केले.

ही कराचीतील सर्वात जुनी आणि सर्वात प्रतिष्ठित माध्यमिक शाळांपैकी एक आहे. गोवन अन्नपदार्थ, गोवन नृत्यामुळे गोवा आणि कराचीतील सांस्कृतिक बंध मजबूत झाले.

सध्या कराचीत इतके गोवन्स

'गोअन्स ऑफ पाकिस्तान - फूटप्रिंट्स ऑन द सॅन्ड्स ऑफ टाईम' पुस्तकाचे लेखक मेनिन रॉड्रिग्स यांच्या मते, कराचीमध्ये सुमारे 6,000 गोवा लोक राहतात. 1950 आणि 60 च्या दशकात ही संख्या सुमारे 15,000 होती. अनेकजण नंतर कॅनडात निघून गेले.

नंतरच्या काळात भारत-पाकिस्तानमधील बिघडलेल्या संबंधांचा परिणाम गोवन समुदायावरही झाला. महागाईमुळे नंतर गोवन पारंपरिक खाद्यपदार्थ शिजवणे बंद झाले. हे पदार्थ एकेकाळी कराचीच्या पाककृतीचा भाग होते.

पाकिस्तानमधील अस्थिरता आणि बदलांमुळेही अनेक गोवावासीयांनी कराची सोडली. कराचीमध्ये आता फक्त 400 पोर्तुगीज गोवन ख्रिश्चन आहेत.

येथील 70 वर्षीय मार्टिन डिसोझा म्हणाले की, फाळणीपूर्वी कराची वेगळी होती. गोवन समाजाने सद्दारमधील सिनेमा, क्लब, हॉटेलमधील संगीत आणि भावनांचा आनंद घेतला. 1950 आणि 1970 च्या दरम्यान कराचीमध्ये शेकडो सिनेमा लागले. येथे नाईट लाइफ मस्त होती.

आशिया आणि मध्य पूर्वेतील इतर पर्यटन केंद्रांना हे शहर टक्कर देत होते. पाकिस्तानने पुराणमतवादी वळण घेतले, ज्यामुळे गोवन लोकांचा इतर देशांकडे प्रवाह वाढला. गोवा समाजातील बरेच लोक बंगल्यातील सोल्जर बझारमध्ये राहत होते, परंतु त्यांनी त्यांची घरे विकली आणि आता शिया समुदायातील लोक तेथे राहतात.

पाकिस्तानमधील गोवन लोकांची संख्या कमी झाली असली तरी, तेथील खाद्यपदार्थ, धर्म, संगीत, व्यापार आणि कराची शहरावरील गोवन लोकांचा प्रभाव मात्र कायम आहे.

(संदर्भ : कराचीतील मुक्त पत्रकार झफर अहमद खान यांनी एक्सप्रेस ट्रिब्यून या नियतकालिकासाठी हा लेख लिहिला होता. त्यामधून हे संदर्भ घेण्यात आले आहेत)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Extortion Case: खंडणीसाठी वास्कोच्या व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

Goa Human Trafficking: गोव्यात कशी होते मानवी तस्करी, कोणती आमिष दिली जातात? डिजीपींनी दिली माहिती

Panaji PS Attack Case: पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणाची 17 जूनला सुनावणी

Goa Politics: लोकांचा भाजपविरोधातील राग व्यक्त, दोन्ही जागा जिंकण्याचा इंडिया आघाडी दावा

Yellow Alert In Goa: गोव्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता, दोन दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

SCROLL FOR NEXT