Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: हेल्मेट घालूनही काळाने झडप घातली! बोरी येथे ट्रकची दुचाकीला भीषण धडक, 32 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

Bori Truck Accident: पारपतीवाडा-बोरी येथे शनिवारी दुपारी मालवाहू ट्रक आणि दुचाकी यांच्‍यात झालेल्या भीषण अपघातात नितीन वैकुंठ गावडे (३२) या दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

बोरी: पारपतीवाडा-बोरी येथे शनिवारी दुपारी मालवाहू ट्रक आणि दुचाकी यांच्‍यात झालेल्या भीषण अपघातात नितीन वैकुंठ गावडे (३२) या दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. हेल्मेट परिधान केलेले असतानाही त्याचा जीव वाचू शकला नाही.

अपघातानंतर ट्रकचालक राजेश कुमार (बिहार) हा ट्रकसह पसार झाला; मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. हा अपघात शनिवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडला.

बेळगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला (जीए-०५-के-०४१५) जोरदार धडक दिली. त्‍यात नितीन गावडे याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून दिला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT