Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: बसच्‍या धडकेत दुचाकीस्‍वार ठार

Goa Accident News: डिचोलीतील घटना : अर्धा तास होता रस्‍त्‍यावरच पडून

दैनिक गोमन्तक

Goa Accident News: डिचोली येथील व्हाळशी आयटीआयसमोर प्रवासी बस आणि दुचाकी यांच्‍यात झालेल्या भीषण अपघातात आनंद नाईक (रा. बोर्डे) हे पन्नाशीतील इसम ठार झाला. ‘हाऊ’ या टोपणनावाने ते परिचित होते. हा अपघात आज सोमवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हापशाहून होंड्याला जाणारी ‘रेश्मा’ नामक प्रवासी बस (जीए 04 टी 2096) व्हाळशी येथील आयटीआयसमोर पोचताच डाव्या बाजूने हाऊसिंग बोर्ड वसाहतीतून अचानक मुख्य रस्त्यावर आलेल्या मोटरसायकलला (जीए 04 डी 4650) जोरदार धडक बसली. त्‍यात मोटारसायस्‍वार आनंद नाईक हे ठार झाले.

जवळपास अर्धा तास ते रस्त्यावरच पडून होते. नंतर पोलिसांच्या रोबोट वाहनातून त्‍यांना डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्‍यांना मृत घोषित केले.

याच रस्‍त्‍याने घेतला होता भावाचाही बळी

मृत्यूचा सापळा बनलेल्या बोर्डे-व्हाळशी या रस्त्याने गेल्या महिनाभरात दोघांचे बळी घेतले. गेल्या सात वर्षांत या रस्त्याने अकरा जणांचे बळी घेतले आहेत. विशेष म्‍हणजे आज अपघातात बळी पडलेले आनंद नाईक यांच्‍या भावाचाही काही वर्षापूर्वी याच रस्त्यावर अपघातात बळी गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT