Accident in Goa Dainik Gomantak
गोवा

धारबांदोड्यात दुचाकीचा भीषण अपघात, तिघे जखमी

अपघातात दुचाकीचं मोठं नुकसान, जखमींवर गोमेकॉमध्ये उपचार सुरु

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात अपघातांची मालिका सुरुच आहे. धारबांदोड्याजवळच असलेल्या संजीवनी साखर कारखान्याजवळ मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर तातडीने तिन्ही जखमींना उपचारासाठी बांबोळीतील गोमेकॉ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

धारबांदोडा परिसरात संजिवनी साखर कारखान्याजवळच मंगळवारी रात्री दुचाकीचा भीषण अपघात पाहायला मिळाला. हा अपघात इतका भीषण होता की यात दुचाकीचं पुढचं चाक तुटून बाजूला आलं, तसंच दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघाताचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. मात्र या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

दुसरीकडे गोव्यात अटल सेतूवरही अपघातांची मालिका सुरुच आहे.‌ रविवारी रात्री झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातानंतर सोमवारी पुन्हा एकदा या सेतूवर अपघात झाला आहे. एका भरधाव कारची वीजेच्या खांबाला धडक‌ बसल्याने भीषण अपघात झाला. अपघातात कारच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालं. रविवारी खड्डा चुकवण्याच्या नादात ब्रेक मारल्याने तीन कारचा विचित्र अपघात झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT