Accident in Old Goa Dainik Gomantak
गोवा

ओल्ड गोव्यात माड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

ओल्ड गोवा येथील राष्ट्रीय पुरातत्व सर्वेक्षण कार्यालयाजवळ दुर्घटना

दैनिक गोमन्तक

ओल्ड गोवा : ओल्ड गोवा परिसरात माड कोसळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ओल्ड गोवा येथील राष्ट्रीय पुरातत्व सर्वेक्षण कार्यालयाजवळ ही दुर्घटना घडली. शुक्रवारी दुपारी हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर तरुणाला रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. (Accident in Old Goa News Updates)

ओल्ड गोवा (Old Goa) येथे माड पडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव संजय गावस असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर मृत तरुणापाशी त्याचं ओळखपत्र सापडलं आहे. या ओळखपत्रानुसार संजय हा एका फार्मा कंपनीचा कर्मचारी असल्याचं स्पष्ट झालं आहे. गोव्यात अनेक ठिकाणी झाडे कमकुवत स्थितीत असून त्यामुळे अपघातांची भीती निर्माण झाली आहे. त्यातच ओल्ड गोवा परिसरात झालेल्या अपघाताने (Accident) या झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान थिवी परिसरात बुधवारी दुपारी झालेल्या अपघातात दोन कारगाड्यांची समोरासमोर टक्कर होऊन दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, स्विफ्ट कार आणि स्कॉर्पिओ या दोन्ही वाहनांतील कुणालाही दुखापत झालेली नाही. माडेल-थिवी येथील मुख्य रस्त्यावर हा अपघात (Accident) झाला. धावत्‍या स्विफ्ट कारचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात घडला. त्‍यात स्विफ्ट कारच्‍या दर्शनी भागाचे तर स्कॉर्पिओच्या दरवाजाच्या बाजूने नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025: आशिया चषकात भारतीय संघाचा दबदबा! कझाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजून साधली 'हॅटट्रिक'

Mapusa Nirmalya Kalash: म्हापसा येथे 'निर्मल्या कलश' ठरला गेम चेंजर; गणेशोत्सवात घालून दिला पर्यावरण रक्षणाचा नवा आदर्श!

Acidity: पोटातली जळजळ धोकादायक! अ‍ॅसिडिटीमुळे होऊ शकतात 'हे' 5 गंभीर आजार, वेळीच व्हा सावध; जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

PM Modi In China: पंतप्रधान मोदींची ग्लोबल फॅन फॉलोईंग! चीनी सोशल मीडियावर ‘नंबर-1’ वर ट्रेंड; जिनपिंग-पुतिनसोबतची भेट ठरली खास

पार्टीत ओळख, मैत्री, प्रेम आणि लग्न... प्रियाच्या जाण्याने प्रेमकथा अपूर्ण; 'ती' पोस्ट होतेय Viral

SCROLL FOR NEXT