Mapusa Drug Case: राज्यात पर्यटन हंगाम तेजीत असताना, अमली पदार्थ तस्करीचे प्रकार समोर येत आहेत. अमली पदार्थच्या तस्करीमध्ये परराज्यातील नागरिकांच्या सहभाग वेळोवेळी दिसून आला आहे.
साळगाव येथे गांजा विक्री प्रकरणी बिहारच्या 19 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक लाखाहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
(Bihar Youth arrested for Drug dealing In Mapusa)
अभिराज कुमार सिंग (वय 19, रा. मूळ बिहार) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
ग्रॅण्ड मरड, साळगाव याठिकाणी पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. मंगळवारी दुपारी 2.40 च्या सुमारास ही कारवाई करत, 1.10 लाख किमतीचा 1.110 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रॅण्ड मरड जंक्शनवर अमली पदार्थाचा विक्री व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परिसरात पोलिसांनी सापळा रचून संशयित त्याठिकाणी आल्यानंतर त्याला अटक केली. संशयिताची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ 1.110 किलोग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ आढळून आला.
संशयिताविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून अटक केलीय. पोलिस निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीलम गावस, वैभव आरोंदेकर, राहुल अंगोळकर, तुळशीदास गावस यांनी ही कारवाई केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.