Bihar Crime News Dainik Gomantak
गोवा

Crime News: प्रेयसीच्या डोक्यात शिजला कट, आक्षेपार्ह फोटो शेअर करणाऱ्या बॉयफ्रेंडचा गोव्यातून बोलवून केला गेम

Bihar Crime News: हत्येचा कट रचणारी प्रेयसी तिच्या आई-वडिलांसोबत फरार असून तिचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Pramod Yadav

Bihar Crime News

बिहार: ताटातूट झाल्यानंतर बॉयफ्रेंडने प्रेयसीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तिच्या घरच्यांना पाठवले. संतप्त झालेल्या प्रेयसीने बॉयफ्रेन्डच्या हत्येचा कट रचला. लग्नाचे आमिष देऊन त्याला गोव्यातून गावाला बोलावून घेतले.

बॉयफ्रेन्ड गावाला येताच चुलत भावाच्या मतीने त्याची हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. मुजफ्फरपूर, बिहार येथे ही घटना घडली आहे.

जयप्रकाश (रा. बिहार) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. जयप्रकाशच्या हत्येप्रकरणी रवींद्र महतो (बुरहानपूर) याला अटक करण्यात आली आहे. पण, हत्येचा कट रचणारी प्रेयसी तिच्या आई-वडिलांसोबत फरार असून तिचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी अटक केलेल्या महतो यांची चौकशी केली असता त्यांने या प्रकणातील संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

प्रेम ते ताटातूट

मृत जयप्रकाश आणि त्याची प्रेयसी तीन वर्षापासून प्रेम संबंधात होते. प्रेयसी काही दिवसांनतंर परीक्षेच्या तयारीसाठी पटनाला गेली. यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा येत गेला. जयप्रकाश लग्नासाठी तिला गळ घालत होता मात्र प्रेयसाठी त्यासाठी तयार नव्हती.

याच काळात जयप्रकाशच्या भावाने त्याच्यासाठी गोव्यात नोकरी शोधली होती. दरम्यान, त्याने प्रेयसीसोबतचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तिच्या नातेवाईकांना पाठवले. नातेवाईकांनी धमकावल्यानंतर घाबरलेल्या जयप्रकाशला गोव्याला पळ काढला. संतापलेल्या प्रेयसीने त्यानंतर जयप्रकाशच्या हत्येचा कट रचला.

असा रचला कट

जयप्रकाशने आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यानंतर प्रेयसीने त्यांच्याशी संपर्क साधला. आपण लग्न करुया तू गावाला ये असे त्याला सांगितले. दरम्यान, घाबरलेला जयप्रकाश गावी येण्यास तयार नव्हता. तुम्ही माझी हत्या कराल अशी भीती त्यांने व्यक्त केली. पण, प्रेयसीने त्याला काही दिवस समजावून तू गावाला ये आपण लग्न करुया, असे वारंवार समजावले. प्रेयसीने लग्नाच्या दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेऊन जयप्रकाश गावाला आला.

हत्या केली तो दिवस

जयप्रकाश मुजफ्फरपूरमध्ये आल्यानंतर तो प्रेयसीला भेटला. दोघांना एका हॉटेलमध्ये एकत्र नाश्ता केला. त्यानंतर जयप्रकाश घेऊन प्रेयसी चुलत भावाच्या घरी गेली.

घरी गेल्यावर चाकूच्या मदतीने तिने जयप्रकाशची हत्या केली. प्रेयसीने चाकून जयप्रकाशचे शरीराचा चेंदामेंदा केला. त्यानंतर जयप्रकाशचा मृतदेह एका पोत्यात भरुन सायकलवरुन तो घटनास्थळावरुन जवळपास १०० मीटर दूर फेकला. जयप्रकाश आणि त्याची प्रेयसी जवळचे नातेवाईक देखील होते, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

पोलिस तपासात काय आले समोर?

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासले असता प्रेयसीने जयप्रकाशचा मृतदेह घेऊन जातानाचे फुटेज मिळाले आहे. जयप्रकाशची हत्या करण्यात आली त्यावेळी घरात प्रेयसीसह आणखी पाच लोक होते असेही तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी या प्रकरणात संशयित प्रेयसीच्या चुलत भावाला अटक केली आहे. तर, संशयित प्रेयसी व तिचे आई-वडील फरार आहेत. पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT