गोवा एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला Heart Attack, 50 मिनिटे आलीच नाही रुग्णवाहिका, महिलेने गमावला जीव

Goa Express: महिलेला ट्रेनमधून उतरवल्यानंतरही अनेकवेळा रुग्णवाहिकेला फोन करण्यात आला.
गोवा एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला Heart Attack, 50 मिनिटे आलीच नाही रुग्णवाहिका, महिलेने गमावला जीव
Goa Express
Published on
Updated on

Goa Express

गोवा एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाला धावत्या ट्रेनमध्ये हृदयविकाराचा झटका आला. महिलेला ग्वाल्हेर रेल्वे स्थानकावर सोडण्यात आले. घटनेबाबत 108 रुग्णवाहिकेला माहिती देण्यात आली.

50 मिनिटे अनेक वेळा फोन करूनही रुग्णवाहिका स्थानकावर पोहोचली नाही. अखेर खासगी रुग्णवाहिकेतून महिलेला रुग्णालयात दाखल केले खरे पण तिला मृत घोषित करण्यात आले.

विजय भारती असे मृत महिला प्रवाशाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला प्रवासी विजय भारती आणि त्यांचे पती राजबीर सिंग हे गोवा एक्स्प्रेसच्या ए-१ डब्यातून आग्रा ते पुण्याला जात होते. ट्रेन मोरेनाहून निघाली तेव्हा भारती यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पाहून ट्रेनमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांनी ग्वाल्हेर स्टेशनला याबाबत माहिती दिली.

रात्री 9.30 वाजता ट्रेन ग्वाल्हेरला पोहोचली. यापूर्वीही 108 रुग्णवाहिकेला या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती, मात्र तोपर्यंत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नव्हती.

गोवा एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला Heart Attack, 50 मिनिटे आलीच नाही रुग्णवाहिका, महिलेने गमावला जीव
'CM येत नाहीत तोवर एक इंचही मागे हटणार नाही'; Goa Miles विरोधात टॅक्सी व्यावसायिक आक्रमक, पेडण्यात 'चक्का जाम'

महिलेला ट्रेनमधून उतरवल्यानंतरही अनेकवेळा रुग्णवाहिकेला फोन करण्यात आला, मात्र प्रत्येक वेळी त्यांच्याकडून लवकरच पोहोचत आहोत, असे आश्वासन देण्यात आले. 50 मिनिटे थांबूनही रुग्णवाहिका न आल्याने खासगी रुग्णालयाशी संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावण्यात आली.

खासगी रुग्णवाहिकेतून महिलेला रुग्णालयात दाखल केले पण, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महिलेला मृत घोषित केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com