police custody dainik gomantak
गोवा

अत्याचार प्रकरणी गोव्यात राहणाऱ्या बिहारीला पोलीस कोठडी

अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार करणाऱ्या बिहारच्या एकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या; दोन दिवसांची पोलिस कोठडी

दैनिक गोमन्तक

मडगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी एका नराधमाला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रमोद महतो (वय - 25) असे या नराधमाचे नाव असून तो मुळचा बिहारमधील (Bihar) रहिवाशी आहे. रविवारी पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली होती. (Bihar man remanded in police custody in rape case)

सासष्टी तालुक्यातील अल्पवयीन विद्यार्थिनीवर कथित अत्याचार केल्याप्रकरणी रविवारी कुंकळ्ळी पोलिसांनी (Cuncolim police) मुळचा बिहारचा रहिवाशी असणाऱ्या प्रमोद महतो याला अटक केली. तसेच त्याला न्यायालयापुढे हजर केले असता, त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी, अल्पवयीन विद्यार्थीनीचा लैंगिक छळ करत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोपावरून महतो याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर आयपीसीच्या कलम 376 आणि 354 अंतर्गत अत्याचार (बलात्कार) (rape) आणि लैंगिक छळ (sexual harassment) आणि मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, 2012, (POCSO कायदा) आणि गोवा बाल अधिनियमाच्या कलम 8 अंतर्गत अत्याचाराचा (बलात्काराचा) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तर पीडित मुलगी आणि आरोपी या दोघांना अधिक तपासातंर्गत गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, बांबोलीम (Bambolim) येथे वैद्यकीय तपासणीसाठी शनिवारी पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी नक्की काही अत्ताच सांगता येणार नसून सविस्तर अहवाल आल्यानंतरच न्यायालय (Court) याप्रकरणी योग्य निर्णय घेईल. दरम्यान शुक्रवारी, शेजारी राहणाऱ्या महतो याने आपल्या अल्पवयीन मुलीवर आरोपीने अत्याचार केला होता, अशी तक्रार पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली होती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT