Crime
Crime Dainik Gomantak

सासष्टी येथील अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; कथित आरोपी गजाआड

शनिवारी कुंकळ्ळी पोलिसांनी प्रमोद महतो याला अटक केली.
Published on

मडगाव: सासष्टी येथील एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोपाखाली कुंकळ्ळी येथील व्यक्तीला अटक करण्यात आली. व्यक्तीचे वय 25 असून तो मूळचा बिहारचा रहिवाशी आहे.

Crime
विजय भिकेंच्या वक्तव्‍याचा गोवा फॉरवर्डकडून निषेध

शनिवारी कुंकळ्ळी पोलिसांनी (Police) कथित आरोपी प्रमोद महतो याला अटक केली. पीडिता आणि आरोपी शेजारी असून ते IDC कुंकळ्ळी जवळ भाड्याच्या खोलीत राहत होते.

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक कविता रावत यांनी आरोपी प्रमोद याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 354 नुसार बलात्कार, लैंगिक छळ आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीला गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (GMC), बांबोळी येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

Crime
काँग्रेसचे 4 आमदार भाजपच्या संपर्कात

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली की तिच्या अल्पवयीन मुलीवर आरोपीने बलात्कार केला. आईने शुक्रवारी तक्रार नोंदवली आणि शनिवारी पीएसआय कविता रावत यांनी सापळा रचून आरोपी प्रमोदला आयडीसी परिसरातून अटक केली. “कथित आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले जाईल,” असे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com