देशातील नागरिकांमध्ये देशप्रेम, अनुसाशन असणे गरजेचे आहे. जी व्यक्ती सरकारी नोकरीत येऊ इच्छिते, त्यासाठी त्याला दोन वर्षे सैनिक प्रशिक्षण घेणे अनिवार्य करा, तसे करणे गरजेचे आहे, असे बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले.
‘चैतन्य प्रतिष्ठान गोवा’तर्फे कला अकादमी येथे आयोजित ‘एक राखी सैनिकांसाठी’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, टीजेएसबी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शरद गांगल उपस्थित होते. दरम्यान आर्लेकर म्हणाले, प्रशिक्षणामुळे एक प्रकारची शिस्त येते अनेक देशांमध्ये सरकारी नोकरी हवी असेल तर सैन्य प्रशिक्षण घ्यावे लागते, असे त्यांनी सांगितले.
आर्लेकर पुढे म्हणाले, आमचे गोमंतकीयांचे नाते हे भारतमातेशी आहे, हे वारंवार सिद्ध करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांची आवश्यकता आहे. सीमेवर सैनिक देशाची सुरक्षा करतात म्हणून आम्ही येथे शांती अनुभवत आहोत, त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आमचे कर्तव्य आहे.
शरद गांगल म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कार, प्रेरणा आणि आदर्श यांचा मिलाप व्यक्त होत आहे. मुलांमध्ये राष्ट्रीय संस्काराची बीजे इतर कोणत्याही उपक्रमातून रूजणार नाहीत त्याहीपेक्षा अधिक आपण सिमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकाला राखी पाठवत आहे या विचारातूनच व्यक्त होत आहेत. अशा प्रकारचा उपक्रम प्रत्येक राज्यात होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सेना केवळ सीमेवरच युद्ध लढत नाहीत, परंतु ज्यावेळी नैसर्गिक दुर्घटना घडतात, तेव्हाही मदतीसाठी धावून जाते. भरतीय सैन्याला पंधरा वर्षापूर्वी बुलेटप्रुफ जॅकेट मिळत नव्हते, परंतु आता आम्ही जगातील सुमारे ८० देशांना शस्त्रे पुरवतो. येत्या काळात भारतीय सेना ही जगातील सर्वात मोठी तिसरी ताकदवान सेना असेल. राखी केवळ साधारण धागा नसून ते रक्षा सूत्र आहे. हजारो वर्षांच्या परंपरेचे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे.गोव्यातून पाठविण्यात येणाऱ्या या राख्यांबद्दल सर्व सैनिकांच्या वतीने मी गोमंतकीयांचे आभार मानत असल्याचे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी सांगितले.
गोवा हे भारतीय नौसेनेचे महत्त्वाचे ठिकाण आहे. गोव्यातून देशाच्या समुद्री सीमेच्या सुरक्षेचे महत्त्वाचे ठिकाण आहे. परंतु गोव्यातील नागरिक सैन्यात कमी प्रमाणात भरती होतात. येथील नागरिकांना सैन्याचे काम कसे चालते हे कळावे, युवकांना जर सैन्यदलाचे कार्य समजले तर ते निश्चितपणाने सैन्यात भरती होतील. त्यामुळे येणाऱ्या काळात ‘नो युवर आर्मी’ हे प्रदर्शन भरविले जाईल, तसेच सैन्य शाळा सुरू करण्यासाठी सहाय्य केले जाईल असे प्रतिपादन सुरक्षा राज्यमंत्री संजय सेठ यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.