CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Bihar Diwas 2025: 'गोमंतकीय संस्कृती आत्मसात करा, बिहारी गुन्हेगार गोव्यात नकोत'; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

CM Pramod Sawant Bihar Diwas Speech: मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्र्यांनी सर्व बिहारी नागरिकांना गोव्याची संस्कृती जपण्याचे आणि पालन करण्याचे आवाहन केले.

Manish Jadhav

Bihar Diwas Goa CM Pramod Sawant Urges Biharis to Embrace Goan Culture

दरवर्षी 22 मार्च हा दिवस 'बिहार दिन' म्हणून साजरा केला जातो. बिहारसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण या दिवशी राज्याचा वर्धापन दिन म्हणजे बिहार दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या बिहार दिनाचा उत्साह गोव्यात देखील पाहायला मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बिहार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांनी उपस्थितांसह बिहारी नागरिकांना बिहार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

काय म्हणाले मुख्यमंत्री सावंत?

दरम्यान, बिहार दिनाच्या (Bihar Diwas 2025) कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्र्यांनी सर्व बिहारी नागरिकांना गोव्याची संस्कृती जपण्याचे आणि पालन करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री म्हणाले की, ''गोव्यातील लोक सर्व धर्म समभावाने राहतात. आम्हाला गोव्यात बिहारचा गुन्हेगार नको आहे. गुन्हेगारातील सहभागामुळे बिहारचेच (Bihar) नाव खराब होते. गोव्यातील सर्व बिहारी नागरिकांनी डबल इंजिन सरकारला सहकार्य करावे.''

बिहारींचे मोठे योगदान

गोव्याच्या विकासात बिहारी नागरिकांचे मोठे योगदान आहे. एवढेच नव्हे, तर गोव्याच्या मुक्तिस्वातंत्र्यातही बिहारमधून आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे गोवा राज्याला लवकर मुक्ती मिळण्यास मदत झाली. त्यांचे योगदान आम्ही विसरु शकत नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.

बिहार दिन का साजरा केला जातो?

बिहार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश राज्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानाचा सन्मान करणे आणि राज्याच्या प्रगतीसाठी संकल्प करणे हा आहे. या दिवशी बिहारमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, जत्रा आणि उत्सवांचे आयोजन केले जाते. बिहारमधील लोककला, संगीत, नृत्य आणि खाद्यसंस्कृतीचे यानिमित्ताने विशेष प्रदर्शन केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT