Kiran Mane  Dainik Gomantak
गोवा

"बीचवर बीयर पीत पहुडलोय...", प्रसिद्ध मराठी कलाकार करतोय गोव्यात धम्माल

किरण माने हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटींग करण्यासाठी गोव्यात आहेत.

Pramod Yadav

मराठीतील प्रसिद्ध अभिनेते किरण माने (Kiran Mane) नेहमीच चर्चेत असतात. किरण माने मराठी मालिका आणि ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे प्रसिद्धीझोतात आले. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर माने विविध प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. सध्या माने गोव्यात आहेत.

किरण माने यांनी गोव्यातून एक पोस्ट फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर (Facebook & Instagram) शेअर केली आहे.

किरण माने हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटींग करण्यासाठी गोव्यात (Kiran Mane In Goa) आहेत. दरम्यान, त्यांनी शूटींगच्या ठिकाणावरून काही फोटो शेअर केले आहेत. किरण माने मोरजी बीचवर असून, तेथून त्यांनी फोटो शेअर केले आहेत.

...गोवा !

प्रसन्न सुर्योदय... भन्नाट, नादखुळा बीच...

आणि थोड्याच वेळात लाईट - कॅमेरा - ॲक्शन.

एकतर शुटिंगसाठी गोव्यात येणं म्हणजे निव्वळ सुख. त्यात सीन असाय की मी बीचवर बीयर पीत पहुडलोय... मज्जा !

असे कॅप्शन किरण माने यांनी आपल्या पोस्टला दिले आहे.

किरण मानेसोबत सहकारी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) देखील उपस्थित आहे. त्या दोघांनी एकत्र एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. दोघेही मोरजी बीचवर असून, त्यांनी हा दोघांच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे.

किरण मानेंनी ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss)) खेळात टॉप पाचमध्ये त्यांचं स्थान निश्चित केलं होतं. पण ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. दरम्यान, किरण मानेंनी केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून, अनेकजण त्यावर कमेंट करताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

Monsoon: पावसाळा संपायला अवघे 3 दिवस, तरी राज्यात पावसाची मोठी तूट; यंदा 36.41 इंच पाऊस कमी

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT