Externment Orders OF Pastor Dominique Dsouza and Joanne Mascarenhas  Dainik Gomantak
गोवा

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Externment Orders: उत्तर गोव्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १६ मार्च रोजी दिला होता.

Pramod Yadav

Externment Orders

फसवणूक आणि बेकायदेशीर धर्मांतरणाचा आरोप असलेल्या धर्मगुरु डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्कारेन्हस यांना कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दोघांविरोधात काढलेला तडीपारीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द केला आहे.

जुन्या खटल्यांच्या आधारावर तडीपारीचा आदेश देता येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

सडये-शिवोली येथील फाईव्ह पिलर्स चर्चचे धर्मगुरु डॉम्निक डिसोझा आणि जुआन यांना उत्तर गोव्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १६ मार्च रोजी दिला होता.

याबाबत तत्कालिन उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून दोघांना तडीपार करण्याची मागणी केली होती.

सार्वजिनक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तडीपारीची कारावाई व्हावी अशी मागणी वाल्सन यांनी यापत्रात केली होती. डॉम्निक यांनी फोंड्यातील एका ४० वर्षीय व्यक्तील धर्मांतरासाठी धमकावले होते, असा आरोप त्यांच्या विरोधात आहे. मार्च महिन्यांतच डॉम्निकला म्हापसा पोलिसांनी अटक केली होती.

दरम्यान, डॉम्निक आणि त्याची पत्नी जुआन यांच्या विरोधात तडीपार आदेशाला स्थगिती देण्यास राज्याच्या सचिव आणि संबधित प्राधिकरणाने नकार दिला होता.

तडीपार आदेशावर आज (बुधवारी, दि.08 मे) अंतिम निकाल जाहीर केला असून, दोघांच्या तडीपारीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. सुरु आणि प्रलंबित खटल्यांच्या आधारे तडीपारीचा आदेश जारी करता येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT