Govind Gaude Posters

 

Dainik Gomantak

गोवा

'प्रियोळकरांनी धरला जोर, गोविंद गावडे वन्स मोअर'

प्रियोळमध्ये गोविंद गावडे समर्थकांची पोस्टरबाजी

दैनिक गोमन्तक

पणजी : भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी अपक्ष आमदार गोविंद गावडेंना (Govind Gaude) प्रियोळ मतदारसंघातून उमेदवारी देण्याची घोषणा केली. यानंतर प्रियोळ मतदारसंघात गावडे समर्थकांनी ठिकठिकाणी पोस्टरबाजी सुरु केली आहे. 'प्रियोळकरांनी धरला जोर, गोविंद गावडे वन्स मोअर', अशा आशयाची पोस्टरबाजी प्रियोळच्या चौकाचौकात करण्यात आल्याचं चित्र आहे.

गोविंद गावडेंच्या उमेदवारीवरुन प्रियोळ मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. एकीकडे गोविंद गावडेंनी कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं आहे, तर प्रियोळमधील भाजप कार्यकर्त्यांनी मात्र गावडेंच्या उमेदवारीला विरोध केला आहे. मात्र असं असलं तरीही गोविंद गावडेंनीही महालसेचं दर्शन घेत रविवारपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी निवडणुकीपूर्वी (Election) सभांचं आणि बैठकांचं आयोजन केलं जात आहे.

दरम्यान गोविंद गावडेंना उमेदवारी दिल्याच्या परिस्थितीत कोणी पक्षविरोधी बंड केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. प्रियोळ भाजप (BJP) मंडळ पक्षाच्या निर्णयाविरोधात जाणार नाही, असेही भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी स्पष्ट केले आहे. मात्र असं असलं तरीही गावडेंच्या उमेदवारीला आतापासूनच विरोध व्हायला सुरुवात झाली आहे. गोव्यात सध्या फोडाफोडीचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. त्यातच ज्या नेत्यांचे त्यांच्या मतदारसंघात प्राबल्य आहे, अशांना आपल्या पक्षात घेण्यासाठी रस्सीखेचही सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Sports Festival: डिचोलीत रविवारी क्रीडा महोत्सव; 65 शाळांचा सहभाग, छ. शिवाजी महाराज मैदानावर आयोजन

Mapusa: म्हापसा पालिका 'ॲक्शन मोड'वर, महसूल गळती रोखणार; मोबाईल टॉवर, लग्न हॉलची करणार पडताळणी

Mangal Gochar 2026: अडकलेले पैसे परत मिळणार, करिअरमधील तणाव गायब होणार, 3 मार्चला मंगळ-चंद्राचा महासंगम; पालटणार नशीब

आधीच कंगाल, त्यात आता लीगचाही पत्ता कट, पाकिस्तानी खेळाडूंना भारतीय मालकांचा दणका; आंतरराष्ट्रीय लीगमधून होणार हकालपट्टी?

Bicholim: डिचोलीतील बगलमार्गावर दरड खचतेय...! कोसळण्याची भीती; वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT