Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: राज्यात कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ; सक्रीय कोरोनारूग्णांची संख्या 290 वर

जाणून घ्या नवीन कोरोना रूग्णांची संख्या

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Corona Update: गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात एकूण 87 नवीन कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. यापैकी 5 रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर उर्वरीत 82 बाधितांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

नव्याने भर पडलेल्या रूग्णसंख्येने राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या आता 290 वर पोहचली आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्येत वेगाने वाढ होत असल्याने राज्यात कोरोनाची धास्ती वाढू लागली आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये एकूण 24 रूग्ण कोरोनामुक्त झाले तर एकूण 878 चाचण्या करण्यात आल्या. राज्यात कोरोनामुक्तीचा दर 98.34 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.

तर राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे 4013 मृत्यू झाले आहेत. राज्यात एकूण 21 लाख 59 हजार 149 चाचण्या झाल्या आहेत. तर एकूण 2 लाख 59 हजार 608 रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी 2 लाख 55 हजार 305 रूग्ण बरे झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

SCROLL FOR NEXT