Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ; 'इतक्या' नवीन रूग्णांची भर

सक्रीय रूग्णसंख्या पोहचली 178 वर; चाचण्या वाढल्याने रूग्णसंख्येतही वाढ

Akshay Nirmale

Goa Corona Update: कोरोनाच्या चाचण्या कमी असल्या की रूग्णसंख्येची वाढही त्याच प्रमाणात म्हणजे कमी नोंद होते. तर चाचण्यांची संख्या वाढली की कोरोनाची नवी रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. शुक्रवारीही याचाच प्रत्यय आला. शुक्रवारी 24 मार्च रोजी राज्यातील कोरोनाच्या नव्या रूग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आले.

गेल्या 24 तासांमध्ये एकूण 55 नवे कोरोना रूग्ण आढळून आले. यातील 49 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. तर 6 जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक दिवसापुर्वी म्हणजे गुरूवारी एकूण 16 नवीन कोरोनारूग्ण आढळून आले होते आणि सक्रीय रूग्णसंख्या 142 इतकी होती.

गेल्या 24 तासांमध्ये एकूण 555 चाचण्या करण्यात आल्या. तर एकूण 19 रूग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. तर कोरोनामुक्तीचा दर 98.38 टक्के इतका होता.

राज्यात आत्तापर्यंत 21 लाख 56 हजार 865 चाचण्या झाल्या आहेत. तर एकूण 2 लाख 59 हजार 415 रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी 2 लाख 55 हजार 224 रूग्ण बरे झाले. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे 4013 मृत्यू झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT