Big Daddy Casino 2024-25 Dainik Gomantak
गोवा

Goa Drone Show Video: कॅसिनोत झगमगाट, विद्युत रोषणाईत मांडवीचे सौंदर्य खुलले; गोव्यात पहिलाच 'ड्रोन शो’

Goa Big Bash Celebration Panjim: पर्यटकांचं आकर्षण पाहून यंदाच्या वर्षी गोव्याने जमलेल्या सर्वांना खास भेट दिली.

Akshata Chhatre

Goa Big Bash Celebration Viral Video

पणजी: गोवा आणि नवीन वर्ष यांची बरीच जुनी सांगड आहे. नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करायला ३१ डिसेंबरपासूनच गोव्यात लोकांची रंग लागते. काही देशी, विदेशी एवढंच नाही तर मोठाले कलाकार सुद्धा गोव्यात हजेरी लावतात. पर्यटकांचं हेच आकर्षण पाहून यंदाच्या वर्षी गोव्याने जमलेल्या सर्वांना खास भेट दिली.

३१ रोजी मध्यरात्री एका भव्य ‘ड्रोन शो’ने राज्याच्या इतिहासात प्रथमच ५०० ड्रोनच्या सहाय्याने शुभेच्छा दिल्या. नवीन वर्षाच्या काउंटडाऊनच्या आधी १५ मिनिटांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या डिस्प्लेने मांडवी तिरावरचे आकाश प्रकाशित केले.

पणजीत रात्री प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होती आणि या गर्दीतच रात्री १२ वाजताच्या सुमारास ड्रोनने हॅपी न्यू इयर अशा शुभेच्छा दिल्या गेल्या. जमलेल्या समूहामध्ये यानंतर उत्साहाची लाट पसरली आणि सर्वांनीच एकमेकांना भरभरून शुभेच्छा दिल्या.

सोशल मीडियावर सध्या गोव्यात पहिल्यांदा झालेल्या ड्रोनचं सादरीकरण भरपूर गाजतंय आणि नेटकरी देखील अगदी आनंदाने हे सादरीकरण अनुभवल्याचं कमेंट्समधून कळवतायत.

दरम्यान, २५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या बिग बॅश सोहळ्यात अभिनेत्री तमन्ना भाटियाने आपल्या अदाकारीने शोभा वाढवली होती. तिने जादुई परफॉर्मन्स सादर करून उपस्थितांना मुग्ध केले. उत्साहात भर घालत आणि काल नववर्षाच्या पूर्वसंध्येला बिग डॅडी कॅसिनोने गोव्यासाठी एक ऐतिहासिक क्षण सादर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

Mobile Addiction: स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आला, 'कोडॅक' नावाची कंपनी धोक्यात आली; मोबाइल नावाचा 'ब्रह्मराक्षस'

Video: 'ढवळीकर झोपले त्यांना जागे करा'; मुख्यमंत्री कुसुमाग्रजांची कविता सादर करताना युरींची मिश्किल टिपण्णी अन् सभागृहात हशा पिकला

Goa Assembly Session: गोव्यात आता रॉटवेलर, पिटबुलला 'नो एन्ट्री'! विधानसभेत विधेयक संमत, बंदीचा मार्ग मोकळा

Goa Assembly Session: 'गोवा दावे मूल्यांकन विधेयक, 2025' विधानसभेत संमत; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT