Big Bash 2024-25: 'तमन्ना'च्या अदाकारीने उघडणार बिग बॅशचा पडदा! मध्यरात्रीच्या 'ड्रोन शो'चे खास आकर्षण

Big Daddy Casino Big Bash 2024-25: ‘बिग डॅडी’ कॅसिनोच्या या उपक्रमामध्ये २६ डिसेंबर रोजी ‘झलक दिखला जा’ फेम स्कारलेट विल्सन, २७ रोजी जिदमधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या मन्नारा चोप्रा हिची अदाकारी, तर २८ रोजी ‘नागीन’फेम निया शर्मा आकर्षण ठरणार आहे.
Tamannaah Bhatia Big Bash Goa
Tamannaah Bhatia Big Bash GoaX
Published on
Updated on

Big Bash 2024-25 Tamannaah Bhatia Performance

पणजी: ‘बिग डॅडी कॅसिनो’ बिग बॅश २०२४-२५चा प्रारंभ २५ डिसेंबरपासून ‘बाहुबली’फेम तमन्ना भाटीया हिच्‍या कार्यक्रमाने होणार आहे. तर नववर्षाच्या पूर्वसंध्येचे प्रमुख आकर्षण गायक रॅपर किंग ठरणार आहे, अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

‘बाहुबली’ चित्रपटातील भूमिकेसाठी चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री तमन्ना भाटीयाची जादुई अदाकारी दिलखेचक ठरणार आहे. त्‍याचबरोबर ३१ रोजीचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य असेल ते म्हणजे मध्यरात्रीचे ड्रोन शो. सुमारे ५०० ड्रोन्सच्या प्रकाशाचा लखलखाट यावेळी आकाश उजळून टाकणार आहे. सुमारे १५ मिनिटे हे प्रकाशमय प्रदर्शन पाहायला मिळणार असून नववर्षाचा हा काऊंटडाऊन ठरणार असल्याचे म्हटले आहे. हे नेत्रदीपक प्रदर्शन स्थानिक तसेच पर्यटक यांच्यासाठी पाहण्यायोग्य ठरणार आहे.

Tamannaah Bhatia Big Bash Goa
Goa Tourism: पर्यटकांनी खरचं गोव्याकडे पाठ फिरवलीय का, सरकारी आकडेवारी काय सांगते? वाचा

‘बिग डॅडी’ कॅसिनोच्या या उपक्रमामध्ये २६ डिसेंबर रोजी ‘झलक दिखला जा’ फेम स्कारलेट विल्सन, २७ रोजी जिदमधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या मन्नारा चोप्रा हिची अदाकारी, तर २८ रोजी ‘नागीन’फेम निया शर्मा आकर्षण ठरणार आहे. २९ रोजी जोनिता गांधीचे सादरीकरण होणार असून ३० रोजी कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर आणि सुनील ग्रोव्हर हे कलाकार हास्यात्मक कार्यक्रम पेश करणार आहेत. हासिल फेम अदाकारा हृषिता भट्ट या कार्यक्रमांची लज्जत वाढविणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bombay High Court Goa Bench Casino Order
Buddha Purnima 2026 Horoscope
Goa Mandovi River Casino Dispute
Venus Jupiter Conjunction June 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com