Kiran Kandolkar Dainik Gomantak
गोवा

गोवा फॉरवर्डला मोठा धक्का; किरण कांदोळकरांनी पक्षाला ठोकला राम-राम

पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर (Kiran Kandolkar) यांनी गोवा फॉरवर्डला आज रामराम ठोकल्याने गोवा फॉरवर्डला जबरदस्त धक्का बसला

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोवा फॉरवर्डने (Goa Forward) उत्तर गोव्यातील संपूर्ण भिस्त ज्यांच्यावर ठेवली होती त्याच पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर (Kiran Kandolkar) यांनी गोवा फॉरवर्डला आज रामराम ठोकल्याने गोवा फॉरवर्डला जबरदस्त धक्का बसला असून त्यामुळे उत्तर गोवा सर करण्याचे गोवा फॉरवर्डचे मनसुबे ढासळले आहेत. कांदोळकर तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

आज कांदोळकर यांनी गोवा फॉरवर्डचा राजीनामा दिला. पण त्यापूर्वी त्यांनी आपल्या या निर्णयाबद्दल गोवा फॉरवर्डच्या नेत्यांना पुर्णपणे अंधारात ठेवल्याचे कळते. यापूर्वी कांदोळकर यांनी अशाचप्रकारे भाजप पक्ष सोडून ते गोवा फॉरवर्ड पक्षात स्वतःला सामील करून घेतले होते. आपल्या निर्णयाबद्दल सांगताना कांदोळकर यांनी गोवा फॉरवर्ड काँग्रेस पक्षाबरोबर युती करत असल्यामुळे आपण गोवा फॉरवर्ड सोडल्याचे सांगितले. गोव्यात भाजपचा पराभव हे एकमेव आपले ध्येय आहे आणि काँग्रेसकडे भाजपला हरविणे शक्य होणार नाही असे सांगितले.

कांदोळकर यांनी हळडोणा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा यापूर्वी व्यक्त केली होती. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरकारने मान्यही केले होते. मात्र काँग्रेस ही जागा गोवा फॉरवर्डला सोडण्यास तयार न झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. माझ्या कार्यकर्त्याना मी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवायला पाहिजे आहे. एकतर अपक्ष किंवा अन्य कुठल्या वेगळ्या पक्षाच्या उमेदवारीवर मी निवडणूक लढवू असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT