world tuberculosis day 2022  Dainik Gomantak
गोवा

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पणजीत सायकल रॅली

राज्यस्तरीय कार्यक्रमाचे गोवा चेंबर ऑफ कॉमर्स सभागृहात सकाळी 10 वा. आयोजन करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

पणजी: आरोग्य सेवा संचालनालयाच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन उपक्रमातर्फे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 24 मार्च रोजी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे गोवा चेंबर ऑफ कॉमर्स सभागृहात सकाळी 10 वा. आयोजन करण्यात आले. त्याआधी सकाळी 7.15 वा. सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. आरोग्य संचालनालय ते दोना पावल येथून परत आझाद मैदान अशा अंतरासाठी ही सायकल रॅली काढण्यात आली.

सभागृहातील कार्यक्रमप्रसंगी आरोग्य संचालक डॉ.आयरा आल्मेदा प्रमुख पाहुणे म्हणून व डॉ. सियोना गोम्स हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. राज्य क्षयरोग अधिकारी डॉ. मनिष गावणेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. जागतिक क्षयरोग दिनाच्या संकल्पनेविषयी डॉ. आयरा आल्मेदा यांनी यावेळी माहिती दिली.

सायकल रॅलीत भाग घेतलेल्या 60 जणांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदक प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौरिश गांजेकर यांनी केले. औपचारिक क्षयरोग दिन कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रूफिन मोंतेरो उपस्थित होते. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या संचालक डॉ. ज्योती सरदेसाई सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT