Bicholim worker Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: सेझा कामगारांना सेवेत घेणे कंपनीला बंधनकारक

मुख्यमंत्र्यांनी सेझा कामगारांना दिले आश्वासन

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोलीतील ‘खाण ब्लॉक’ कोणाच्याही ताब्यात गेला, तरी सेझाच्या कामगारांना सेवेत घेणे संबंधित कंपनीला बंधनकारक करण्यात येईल. त्यामुळे कामगारांनी ‘घाबरू नये’, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सेझा कामगारांना आश्वासन दिले.

( Bicholim worker is satisfied with the e-auction process of mining block)

‘रिट्रेचमेंट’संबंधी कायद्याची लढाई जिंकलेल्या डिचोलीतील सेझा कामगारांना आता भवितव्याबाबत आशादायक किरण दिसू लागला आहे. त्यातच डिचोलीतील खाण ब्लॉकची ई-लिलाव प्रक्रिया मार्गी लागल्यानेही या कामगारांच्या आशा अधिकच पल्लवीत झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सेझाच्या कामगारांनी आज मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची साखळी येथील रवींद्र भवनात भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनीही या कामगारांना पुन्हा एकदा सकारात्मक आश्वासन दिले.

300 कामगारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत व्यक्त केले समाधान

‘एम्प्लॉईज युनियन ऑफ सेसा मायनिंग वर्कर्स’ या कामगार संघटनेचे कायदा सल्लागार ॲड. अजय प्रभुगावकर यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश कार्बोटकर, किशोर लोकरे, नारायण गावकर, महेश होबळे, दीपक पोपकर आदी पदाधिकाऱ्यांसह 300 हून अधिक कामगारांनी आज मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेऊन समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ayush Healthcare: गोव्यातील दोन्ही आयुष इस्पितळांचे महिनाभरात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्र्यांची माहिती

Merces Court Incident: मेरशी न्यायालयात खळबळ! पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने पोक्सो आरोपी गंभीर जखमी

IND vs WI 5th T20I, Weather Report: रोमांचक मालिका निर्णायक टप्प्यावर, पण पावसानं वाढवली धाकधूक; बंगळुरुचं हवामान ठरवणार भारत-वेस्ट इंडिज सामन्याचा निकाल

Goa Cricket Association: 50 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी जीसीएचा इशारा; आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

SCROLL FOR NEXT