Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Bicholim News : खासदार म्हणून पुन्हा संधी मिळाली, तर बेरोजगार झालेल्या खाण कामगारांना न्याय मिळवून देतानाच, मयेतील स्थलांतरीत मालमत्ता आदी जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी झटणार.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, गोव्याची जीवनदायिनी ''म्हादई''ला संकटमुक्त करताना नद्यांचे संवर्धन होण्यासाठी प्राधान्य देणार. त्याचबरोबर कायदेशीर मायनिंगसाठी प्रयत्न करणार. अशी ग्वाही काँग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार ऍड. रमाकांत खलप यांनी दिली.

खासदार म्हणून पुन्हा संधी मिळाली, तर बेरोजगार झालेल्या खाण कामगारांना न्याय मिळवून देतानाच, मयेतील स्थलांतरीत मालमत्ता आदी जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी झटणार. असेही ऍड. खलप यांनी स्पष्ट केले. बुधवारी (ता. १) डिचोली बाजारात काँग्रेसने सक्रिय प्रचार केला. या प्रचाराचा आरंभ करताना ॲड. रमाकांत खलप कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते.

अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ऍड. रमाकांत खलप यांनी शहरातील जुन्या बसस्थानका जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन प्रचाराला सुरवात केली. अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी काहीवेळ बाजारात फिरून दुकानदार, विक्रेते आदी व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांना काँग्रेसच्या वचननाम्याचे वाटप केले. नंतर महत्वाच्या कामानिमित्त ऍड. रमाकांत खलप यांना जावे लागले. नंतर कार्यकर्त्यांनी प्रचार पुढे चालूच ठेवला.

कार्यकर्ते एकवटले :

आजच्या प्रचारकार्यावेळी काँग्रेसचे घटक पक्ष असलेल्या पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. गोवा फॉरवर्डचे संतोषकुमार सावंत, ''आप''चे प्रा. राजेश कळंगुटकर, साखळीचे माजी नगराध्यक्ष राजेश सावळ, काँग्रेसचे मेघ:श्याम राऊत, दिलीप गावस, नझीर बेग, बालाखान गौरी, जयदेव परबगावकर, झेनेट डिसौझा, शाहीम कोतवाल आदी कार्यकर्ते प्रचारात सक्रिय सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei River: ‘पिण्यासाठी पाणी’ हे कर्नाटकचे नाटक! ‘म्हादई’ तिन्ही राज्यांसाठी महत्त्वाची; कॅप्टन धोंड यांचे प्रतिपादन

School Bag Weight: ..विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तराचे 'वाढते' ओझे! केंद्राच्‍या निर्णयाकडे गोव्याची पाठ; परिपत्रकाला ‘केराची टोपली’

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT