Bicholim water crisis Dainik Gomantak
गोवा

Bicholim Water Crisis: गोव्यातील 'या' भागावर घोंघावतेय पाणीसंकट! जलवाहिनी गळतीमुळे वाढला धोका; हजारो लिटर पाणी वाया

Goa water crisis: दहा दिवसांपूर्वी डिचोली शहरातील नाईकनगर-बोर्डे येथे स्थलांतरित केलेल्या जलवाहिनीच्या जोडणीचे काम व्यवस्थित झाले नसल्याने या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: दहा दिवसांपूर्वी डिचोलीत निर्माण झालेली पाणी समस्या सुटली असली, तरी ''त्या'' जलवाहिनीचे स्थलांतरित काम सदोष झाल्याने डिचोलीवर पुन्हा पाण्याचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. तशी भीतीही जनतेमधून व्यक्त करण्यात येत आहे.

डिचोली शहरातील नाईकनगर-बोर्डे येथील सर्वे क्र. १४९/२ या जमिनीतून गेलेली ६०० मिमी व्यासाची जलवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी दहा दिवसांपूर्वी म्हणजेच (ता. ७ आणि ८ नोव्हेंबर) असे दोन दिवस मर्यादित पाणी पुरवठा करण्यात येणार, असे ''पीडब्ल्यूडी''ने जाहीर केले होते.

मात्र जाहीर केलेल्या वेळेत जलवाहिनीचे स्थलांतरित करण्याचे काम व्यवस्थितरीत्या पूर्ण कारण्यास संबंधित खात्याला अपयश आले होते. त्यामुळे दोन दिवस नव्हे तर तब्बल साडेतीन दिवस पाण्याची मोठी समस्या उद्भवली होती. परिणामी डिचोलीसह मयेतील बहुतेक भागात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती.

दहा दिवसांपूर्वी डिचोली शहरातील नाईकनगर-बोर्डे येथे स्थलांतरित केलेल्या जलवाहिनीच्या जोडणीचे काम व्यवस्थित झाले नसल्याने या जलवाहिनीतून  मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत आहे. गेल्या दहा दिवसांपासून हा प्रकार चालू असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत जलवाहिनीतून पाणी बाहेर वाहत असल्याचे दिसून येत होते.

त्यामुळे या जलवाहिनीतून दरदिवशी हजारो लिटर पाणी चक्क गटारात वाहून जात आहे. या जलवाहिनीची व्यवस्थितपणे दुरुस्ती करून वाया जाणाऱ्या पाण्याची नासाडी थांबविण्यास संबंधितांना अपयश आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jofra Archer Yorker: स्पीड आणि स्विंगचा बादशाह! आर्चरचा खतरनाक 'यॉर्कर' अन् फलंदाज थेट जमिनीवर Watch Video

VIDEO: ना भरजरी साडी ना मेकअप! साऊथची 'ब्युटी क्वीन' साई पल्लवीचा 'IFFI' मध्येही पारंपरिक लूक, अभिनेत्रीच्या सौंदर्याची होतेय चर्चा

Goa Cable Issue: ..अखेर मार्ग मोकळा! वीज खांबांवरील केबल्स कापल्या जाणार; गोवा खंडपीठाचा स्थगितीस नकार

VIDEO: गोव्यात रशियन कुटुंबाकडून बेकायदेशीर 'टॅक्सी व्यवसाय'; यांना कोणाचा 'आशीर्वाद'? स्थानिकांचा सवाल

Mormugao Port: मोठी बातमी! मुरगाव बंदरात कंटेनर व्यवसाय सुरू, SCI जहाज दाखल; ‘एमपीए’बरोबरच राज्यालाही होणार लाभ

SCROLL FOR NEXT