Bicholim Truck Accident Dainik Gomantak
गोवा

Bicholim: अनर्थ टळला! चालकाचे नियंत्रण गेले, कोल्हापूरला जाणारा औषधवाहू ट्रक कलंडला; व्हाळशी जंक्शनवर अपघातांचे सत्र सुरूच

Bicholim Truck Accident: चौपदरी बगलमार्गावरील व्हाळशी जंक्शनवर औषधवाहू ट्रक कलंडला. हा अपघात शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडला. सदैवाने अनर्थ टळला.

Sameer Panditrao

डिचोली: येथील चौपदरी बगलमार्गावरील व्हाळशी जंक्शनवर औषधवाहू ट्रक कलंडला. हा अपघात काल शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडला. सदैवाने अनर्थ टळला.

यासंबंधीची माहिती अशी की, एमएच-०९- ईएम-८७८२ या क्रमांकाचा औषधवाहू ट्रक बगलमार्गावरून अस्नोडामार्गे कोल्हापूरला जात होता. व्हाळशी जंक्शनवरून ट्रक मुख्य रस्त्यावर घेताना जंक्शनवरील वळणावर ट्रकचालकाचे नियंत्रण गेले आणि ट्रक डाव्या बाजूने कलंडला.

गतिरोधक बसवणे गरजेचे

गेल्या वर्षी वाठादेव-व्हाळशी चौपदरी बगलमार्गाचे लोकार्पण झाले. परंतु या बगलमार्गावर वरचेवर अपघात घडत आहेत. आतापर्यंत चौदा ते पंधरा अपघात घडले आहेत. अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बगलमार्गावरील रम्ब्लर्स काढून गतिरोधक बसवावेत, अशी मागणी रोहिदास गाड व स्थानिकांनी केली आहे.

दुचाकीची धडक; जखमी महिलेचा मृत्यू

मुगाळी येथे रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या मोनिका सिल्वा (वय ७८) यांचा ‘गोमेकॉ’त मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी दुचाकीचालक सुनील तलवार (२८) याच्यावर मायणा कुडतरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला व त्याला अटक केली. उपनिरीक्षक सोनल गावकर हे पुढील तपास करीत आहेत.

बुधवारी, १० रोजी मुगाळी येथील भगवती टाईल्स फॅक्टरी जवळ हा अपघात घडला होता. मोनिका याच भागातील असून, त्या रस्ता ओलांडत होत्या. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीची धडक बसल्याने त्या रस्तावर पडल्या. डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Valpoi: वाळपईला कचऱ्याचा विळखा! उघडी गटारे, प्लास्टिक कचरा आणि सांडपाण्याची समस्या

Viral Video: 'आणखी खा चविष्ट समोसे, चिखल अन् पायाचा मळ एकत्र...', प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणारा व्हिडिओ व्हायरल; IRCTC नं घेतली दखल

Congress On Smart Meter: 'स्मार्ट मीटर'ची प्रक्रिया तात्काळ रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार: अमित पाटकरांचा इशारा

Bicholim Market: टोमॅटो खातोय भाव! 10 रुपयांनी दरवाढ; वालपापडी स्वस्त, राज्याबाहेरील भाज्या महागण्याच्या वाटेवर

Mapusa: म्हापसा परिसरात मान्सूनपूर्व नालेसफाईला वेग! एकूण खर्च रु.60 लाख, आतापर्यंत 65 टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण

SCROLL FOR NEXT