Diwali Panati Dainik Gomantak
गोवा

Diwali 2025: पणत्या बनवण्याचा वारसा मावळतोय! डिचोलीतील व्यवसाय अंधाराखाली; राज्याबाहेरील पणत्यांची चलती

Diwali Panti: डिचोली शहरातील बोर्डे येथील कुंभारवाड्यावर कुंभार समाज बांधवांची वीसहून अधिक घरे आहेत. येथे गणपती मूर्तींसह मातीकामाच्या चित्रशाळा देखील आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: बदलत्या काळातही दीपावली सणाच्‍या दिवसांत पणत्यांचे महत्त्व आजही अबाधित आहे. मात्र डिचोली शहरातील पारंपरिक पणती व्यवसायाचे ‘दिवे’ आता अंधाराच्या दिशेने झुकताना दिसत आहेत. एकेकाळी प्रचंड प्रमाणात चालणारा आणि प्रसिद्ध असलेला कुंभारवाड्यावरील पणती व्यवसाय नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

राज्याबाहेरील पणत्यांचे बाजारपेठेत वाढते आक्रमण, चिकणमातीचा अभाव, लाकडांची अनुपलब्धता आणि आजच्या पिढीची अनास्था आदी कारणांमुळे या पारंपरिक कला व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.

तरीसुद्धा दिवाळी म्हणजेच ‘दिव्यांचा सण’ हे वैशिष्ट्य अजूनही लोकांच्या मनात तितक्याच उत्साहाने जपले गेले आहे.

डिचोली शहरातील बोर्डे येथील कुंभारवाड्यावर कुंभार समाज बांधवांची वीसहून अधिक घरे आहेत. येथे गणपती मूर्तींसह मातीकामाच्या चित्रशाळा देखील आहेत.

साधारण पंधरा वर्षांपूर्वी या वाड्यावर मोठ्या प्रमाणात पणत्या तयार केल्या जात असत. दिवाळी जवळ आली की पुरुष, महिला सर्वजण मातीत रमून पणत्यांना आकार देत. त्या काळात दरवर्षी दहा हजारांहून अधिक पणत्या तयार होत असत. मात्र गेल्या दशकभरात परिस्थिती बदलली. अनेकांनी हा व्यवसाय सोडून दिला असून, सध्या केवळ एक-दोन कुटुंबेच मातीकलेशी नाते जपून आहेत. तेही दिवाळीच्या काळात मोजक्याच पणत्या तयार करतात.

‘दिव्यांचा सण’ मात्र तसाच तेजस्वी

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, प्रकाशाचा उत्सव. नरकासुर दहनानंतर घरोघरी पणत्या प्रज्वलित केल्या जातात. काळ बदलला असला तरी दिव्यांशिवाय दिवाळी अपूर्णच आहे. त्यामुळे जरी कुंभारवाड्यावरील भट्ट्यांमधील धूर थांबला असला तरी गोव्यातील घराघरांत अजूनही ‘प्रकाशाचा दिवा’ पेटलेलाच आहे.

मातीकलेचा दिवा विझू लागलाय

या व्यवसायाच्या घसरणीमागे केवळ उदासीनता नाही तर अनेक व्यावहारिक अडचणीही आहेत. कर्नाटकातील खानापूर, राजस्थान आणि दोडामार्ग तालुक्यातील ‘आयी’ भागात तयार होणाऱ्या स्वस्त पणत्यांनी गोव्याच्या बाजारपेठेत मजबूत स्थान मिळविले आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादनाला मागणी कमी झाली. पूर्वी कुंभारवाड्यावर सहा भट्ट्या होत्या, ज्यात पणत्या आणि इतर मातीच्या वस्तू भाजल्या जात. मात्र लाकडांचा तुटवडा जाणवू लागल्‍याने आज फक्त एकच भट्टी शिल्लक आहे, तीही अर्धवट कार्यरत आहे. त्यामुळे उत्पादन थांबले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आधी कौतुकाची थाप, मग दिला धक्का! डॅरिल मिचेलच्या शतकानंतर कोहलीने नेमकं काय केलं? पाहा व्हायरल व्हिडिओ

छ. संभाजी महाराजांनी सांत इस्तेव्हांव किल्ल्यावर हल्ला केला, पोर्तुगिजांना समजायच्या आत जुवे किल्ला घेतला; गोव्यावर औरंगजेबाची वक्रदृष्टी

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

SCROLL FOR NEXT