डिचोली: डिचोली (Bicholim) तालुक्यातील साखळी परिसरातील एका विद्यालयातील दहावीतील एक विद्यार्थी 'कोविड' पॉझिटिव्ह आढळल्याने या विद्यालयात खळबळ माजली आहे. विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्याचे कळताच, संबंधित विद्यालयाने 'ऑफलाईन' परीक्षा रद्द करून 'ऑनलाईन' परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकाकडून या माहितीस दुजोरा मिळाला आहे. विद्यार्थी 'पॉझिटिव्ह' असल्याचे कळेपर्यंत मात्र पहिल्या दिवसाच्या पेपरांची परीक्षा मात्र 'ऑफलाईन' घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
विद्यार्थी पॉझिटिव्ह
डिचोली तालुक्यातील 'त्या' संबंधित विद्यालयात सोमवारपासून 'कोविड' च्या सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करून 'ऑफलाईन' परीक्षेनेच इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गाना सुरवात झाली होती. पैकी दहावीतील एक विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिला होता. चौकशी केली असता, सोमवारी संबंधित विद्यार्थ्याने 'कोविड' चाचणी केली होती.आणि त्याचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्याची माहिती शाळेला मिळाली. तोपर्यंत दोन्ही वर्गांची आजची परीक्षा झाली होती. विद्यार्थी 'कोविड' पॉझिटिव्ह मिळाल्याचे कळताच, शाळेत धावपळ सुरु झाली. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकाने लागलीच शिक्षकांशी चर्चा करून पुढील परीक्षा 'ऑनलाईन' घेण्याचा निर्णय घेतला. तसा संदेशही मुख्याध्यापकाने सर्व विद्यार्थ्यांना पाठवला आहे.
सरकारच्या परिपत्रकानुसार,
काल सोमवारपासून शाळांनी नववी ते बारावीचे 'ऑफलाईन' वर्ग सुरु झाले आहेत. सोमवारपासून शाळांनी परीक्षाही सुरु झाली आहे.
पालक भयभीत
दरम्यान, कोविड पॉझिटिव्ह मिळालेल्या विद्यार्थ्यांसोबत त्याच्या वाड्यावरील काही विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. काही विद्यार्थीही संबंधित विद्यार्थ्याच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये खळबळ माजली असून, ते भयभीत झाले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.