Bicholim Temple Theft Dainik Gomantak
गोवा

Bicholim Theft: ..डिचोलीत पुन्हा मंदिरात चोरी! टोळी सक्रिय झाल्याचा संशय; नागरिकांमध्ये भीती

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: डिचोली शहरात पुन्हा एकदा मंदिरे फोडणारी टोळी सक्रिय झाली आहे, गुरुवारी मध्यरात्री शहरातील आतीलपेठ परिसरातील ‘वृंदावन अपार्टमेंट’ मधील श्री शिवलिंग मंदिरातील फंडपेटी फोडून आतील रोखड लंपास केली. चोरांनी मंदिराच्या डाव्या बाजूने असलेल्या फाटकाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. त्यांच्या हाती मोठेसे घबाड लागले नसले, तरी फंडपेटी फोडून त्यातील रोकड लंपास केली.

शुक्रवारी सकाळी पुजारी मंदिरात आले असता, चोरीचा हा प्रकार लक्षात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी देवस्थानतर्फे डिचोली पोलिसात रीतसर तक्रार करण्यात आल्याचे देवस्थानचे अध्यक्ष दिगंबर परब आणि दिगंबर मालवणकर यांनी सांगितले.

अडीच महिन्यांत सात मंदिरे लक्ष्य

गेल्या अडीच महिन्यांपासून चोरांनी डिचोली शहरात धुमाकूळ घातला आहे. जून महिन्यात एकाच रात्री शहरातील चार मंदिरे फोडली होती. आता चतुर्थीच्या धामधुमीत चोरांनी पुन्हा एकदा आपल्या कारवाया सुरु केल्या आहेत. या प्रकारामुळे शहरात खळबळ माजली आहे. डिचोलीत पुन्हा मंदिरे फोडणारी टोळी कार्यरत झाली असावी, असा संशय वर्तविण्यात येत आहे. डिचोली शहरात रात्रीच्यावेळी पोलिस गस्त ठेवावी, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Smart City: प्रशासन 'पुन्हा' अपघात होण्याची वाट पाहत आहे काय? 'सांतिनेज-पणजी' येथे पुन्हा झाडांकडे अक्षम्य दुर्लक्ष

Goa Art: कॉमर्समधून पदवी घेतलेल्या आशिषचा चित्रकारापर्यंतचा प्रवास, कला क्षेत्रात आर्थिक स्थैर्य असते का?

Bicholim Accident: काळ आला होता पण..! वाठादेव बगलमार्गावर पुन्हा अपघात; पायलट थोडक्यात बचावला

Bhutani Infra: ..तर 'वायनाड'ची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही! सांकवाळ येथे रॅलीतून 'भूतानी' विरोधात इशारा

Leopard In Goa: रात्रीच्या वेळी बिबट्याचा संचाराने लोकांच्यात दहशत! कोरगावात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT