Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : डिचोलीत तरवा पेरणीची कामे सुरू

Bicholim News : कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना सहकार्य

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, यंदा मॉन्सून वेळेवर आणि दमदारपणे सक्रिय झाल्याने डिचोलीतील बळीराजा सुखावला आहे. पावसाच्या दमदार सुरवातीनंतर आता डिचोलीतील वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांनी शेती कामाकडे लक्ष केंद्रित केले असून, बळीराजा हळूहळू शेतीत उतरू लागला आहे.

यंदा भात लागवडीची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी कृषी खातेही सज्ज झाले असले, तरी डिचोलीत अजूनही अनुदान तत्त्वावर देण्यासाठी भात बियाणे उपलब्ध झालेले नाही, अशी माहिती मिळाली आहे.

सध्या मयेसह, साळ आदी काही भागात शेती नांगरणीची कामेही सुरू झाली आहे. सध्या होतेय, तशीच पर्जन्यवृष्टी होत राहिल्यास, पुढील आठवड्यापर्यंत शेती मशागतीच्या कामांना वेग येऊन तरवा पेरणीच्या कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. डिचोली हा कृषीप्रधान तालुका. तालुक्यातील साळ, मेणकुरे, धुमासे, लाटंबार्से, बोर्डे, मये, पिळगाव, नार्वेसह बहूतेक भागात दरवर्षी खरीप शेती लागवड करतात.

विभागीय कृषी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात डिचोलीत

१ हजार ३६८ हेक्टर शेतजमीन आहे. अधिकाधिक शेतजमीन खरीप भात लागवडीखाली आणण्याचे उद्धीष्ट्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी कृषी खाते सज्जही आहे. सध्या काही भागात ट्रॅक्टरद्वारे नांगरणीही करण्यात येत आहे. कृषी खात्यातर्फे ५० टक्के अनुदान तत्वावर भात बियाणे उपलब्ध करुन देण्यात येते. चालू आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांना भातबियाणे उपलब्ध होणार आहे.

-दीपक गडेकर, कृषी अधिकारी, डिचोली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT