Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : शिरगावात लईराई देवीच्या जत्रेची तयारी जोरात; ग्रामस्थांत उत्साह

Bicholim News : १२ मे रोजी जत्रा; यंदाही प्लास्टिकमुक्तीचा देवस्थानचा संकल्प

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि देश-विदेशात प्रसिद्धीस पावलेल्या शिरगावच्या श्री लईराई देवीची जत्रा यंदा येत्या रविवारी (ता. १२) साजरी होणार आहे. जत्रेला अवघेच आठ दिवस असल्याने सध्या शिरगावात जत्रेचा उत्साह संचारू लागला असून तयारीही सुरू झाली आहे.

जत्रोत्सव निर्विघ्नपणे साजरी होण्यासाठी देवस्थान समितीही कामाला लागली असून यंदाही प्लास्टिकमुक्त जत्रा साजरी करण्याचा देवस्थान समितीने संकल्प केला आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष गणेश चंद्रकांत गावकर यांनी दिली.

जत्रेच्या पार्श्वभूमीवर आज शिरगाव येथे प्रशासकीय पातळीवरील एक बैठक होऊन जत्रेची तयारी आणि व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. देवस्थानचे प्रशासक तथा डिचोलीचे मामलेदार विमोद दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस पोलिस, वीज आदी विविध सरकारी खात्यांचे प्रतिनिधी यांच्यासह श्री लईराई देवस्थानचे अध्यक्ष गणेश गावकर, सचिव भगवंत गावकर अन्य पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

या बैठकीत जत्रेच्या तयारीचा आढावा तसेच वाहतूक आणि अन्य अत्यावश्यक सेवेच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे, अशी सूचना करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

गर्दी टाळण्याचे आवाहन

भक्तांच्या हाकेला पावणारी देवी. अशी ख्याती असलेल्या श्री लईराई देवीच्या जत्रेला दरवर्षी धोंड भक्तगणांसह भाविकांचा महापूर लोटत असतो. जत्रेच्या दिवशी तर लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि ओट्या भरण्यासाठी मंदिरात पहाटेपासून गर्दी करतात. भाविकांच्या गर्दीमुळे जत्रोत्सवातील काही पारंपरिक धार्मिक विधी करताना गैरसोय निर्माण होत असते. ही गैरसोय टाळण्यासाठी देवीचा ‘चिरा’ आणि कलश बाहेर काढताना शक्यतो भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT