Sarvona Ghodemodni Dainik Gomantak
गोवा

Ghodemodni: 'बोला पुंडलिक वर दे..'! अभूतपूर्व जल्लोषात सर्वणची घोडेमोडणी साजरी; शेकडो नागरिकांची उपस्थिती

Sarvona Ghodemodni: ढोल-ताशांचा निनाद आणि तालावर डिचोलीतील सर्वण गावातील शिमगोत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण ‘घोडेमोडणी’ अभूतपूर्व उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: ढोल-ताशांचा निनाद आणि ''ह. ह. ह..हा...!'' च्या तालावर डिचोलीतील सर्वण गावातील शिमगोत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण ‘घोडेमोडणी’ अभूतपूर्व उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. घोडेमोडणीनंतर होमकुंडोत्सव साजरा करण्यात आला.

या घोडेमोडणीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. यंदाही डिचोलीसह वेगवेगळ्या भागातील मिळून शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावून या घोडेमोडणीचा मनसोक्त आस्वाद घेतला. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही घोडेमोडणी वेळी ढोल बडवून घोडेमोडणीची मजा लुटली.

होळीपौर्णिमेच्या पाचव्या दिवशी सर्वणची ‘घोडेमोडणी’ साजरी करण्यात येते. शुक्रवारी रात्री १० वाजता पारंपरिक रोमटाचे श्री श्यामपुरुष मंदिरात आगमन झाल्यानंतर त्याठिकाणी लोकनृत्य सादरीकरण झाले. नंतर वडाजवळ रचण्यात आलेले होमकुंड पेटविण्यात आले. सजविलेल्या दोन्ही घोडेस्वारांना होळीजवळ आणण्यात आले.

त्याठिकाणी गाऱ्हाणे घातल्यानंतर ढोल-ताशे, झांज आणि ''ह. ह. हहा...’च्या ठेक्यावर आणि आबालवृद्धाच्या साथीत घोडेमोडणीचा ताल सुरु झाला. भाटले परिसरात पाच फेरे मारल्यानंतर घोडेमोडणीची सांगता झाली.

वेगवेगळ्या भागांतून गर्दी

घोडेमोडणी झाल्यानंतर मध्यरात्री होमकुंड उत्सव साजरा झाला. घोडेस्वार आणि भक्तगण तळीवर पवित्र स्नान करून आले. नंतर ''बोला पुंडलिक वर दे'' आदी जयघोष करीत भक्तगणांनी होमकुंडातील पेटत्या निखाऱ्यातून अग्नीदिव्य केले. भक्तगणांचे अग्नीदिव्य पाहण्यासाठीही वेगवेगळ्या भागातील लोकांनी गर्दी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT