Bicholim River Front Dainik Gomantak
गोवा

Bicholim River Front: ‘रिव्हर फ्रंट’चे सौंदर्यीकरण हरवतेय! डिचोलीत अस्तित्वासाठी संघर्ष; देखभालीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष

Bicholim River Front: सेतू संगमवरील 'रिव्हर फ्रंट' प्रकल्प दिवसेंदिवस आपले सौंदर्यीकरण हरवत चालला असून, या प्रकल्पाला अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: शहराच्या वैभवात भर घालणारा सेतू संगमवरील 'रिव्हर फ्रंट' प्रकल्प दिवसेंदिवस आपले सौंदर्यीकरण हरवत चालला असून, या प्रकल्पाला अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे.

या प्रकल्पाची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची वाताहत होत शहराच्या वैभवात भर घालणारा हा प्रकल्प अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. नऊ वर्षांपूर्वी जलसंपदा आणि बांधकाम खात्यातर्फे शहरातील सेतू संगमवर शहराच्या वैभवात भर घालणारा हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

मात्र या प्रकल्पाची आवश्यक ती देखभाल करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकल्प अजूनही पालिकेच्या ताब्यात देण्यात आलेला नाही. परिणामी कार्यक्रम वगळता हा प्रकल्प विस्मृतीत असल्याचे दिसून येत आहे.

सुरवातीपासूनच ‘श्रेय’वादात अडकलेल्या या प्रकल्पाची देखभाल करण्याकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याने या प्रकल्पाच्या सौंदर्याला अनेक समस्यांचे ग्रहण लागल्याचे आढळून येत आहे. तत्कालीन आमदार नरेश सावळ यांच्या कार्यकाळात हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.

सुरुवातीच्या काळात देखभाल व्यवस्थित होत होती. या प्रकल्पस्थळी अधूनमधून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही होत आहे. मध्यंतरी या प्रकल्पस्थळी दिवाळी उत्सवही साजरा करण्यात येत होता. मात्र हळूहळू या प्रकल्पाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे.

एखादा कार्यक्रम असला की, प्रकल्पस्थळी साफसफाई करण्यात येते. या प्रकल्पात सध्या सर्वत्र चारा आणि पावसाळी रोपे उगवलेली आहेत. त्यामुळे प्रकल्पस्थळी विदारक चित्र दिसून येत आहे. एका कोपऱ्यात तर ''शौच’ विधी करण्यात येत असल्याचे आढळून येत आहे.

सध्या या प्रकल्पात गेल्यास अस्वच्छतेचे दर्शन घडतानाच, असह्य दुर्गंधीचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हा प्रकल्प अद्याप ताब्यात देण्यात आला नसल्याने पालिकाही या प्रकल्पाच्या नियमित स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे समजते.

मद्यपींचा वावर!

अलीकडच्या काळात ‘रिव्हर फ्रंट’ हा प्रकल्प म्हणजे भिकाऱ्यांसाठी आश्रयस्थान बनले आहे. बऱ्याचदा रात्रीच्यावेळी या प्रकल्पात भिकारी आश्रय घेत असतात, अशी माहिती मिळाली आहे. दारुड्यांचाही या प्रकल्पात वावर असतो. काहीजण या प्रकल्पस्थळी मद्यप्राशन करून झोपलेले असतात, अशी माहिती मिळाली आहे. या प्रकल्पस्थळी गैरधंदे चालत असून, दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पावर एका परप्रांतीय युवकाचा निर्दयीपणे खून करण्यात आला होता. यावरून हा प्रकल्प सुरक्षित नसल्याचे आढळून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

शिक्षकच आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालतात तेव्हा... सरकारी शाळांच्या विश्वासार्हतेचे काय?

Crime News: बायकोची हत्या करुन मृतदेह पंख्याला टांगला, प्रेमविवाहाचा 'रक्तरंजित' शेवट; मित्राच्या मदतीनं नवऱ्यानं काढला काटा

SCROLL FOR NEXT