Bicholim Agriculture Rice Farm Dainik Gomantak
गोवा

Agriculture News : डिचोलीत भातशेती फुलली ; उत्पन्न वाढणार, शेतकऱ्यांत उत्साह

कापणीच्या वेळी वरुणराजाने कृपादृष्टी केली तर यंदा भात पीक चांगले मिळणार, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. कृषी खात्यालाही तसा विश्वास आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Agruculture News : डिचोली, ता. १० (प्रतिनिधी) : तालुक्यातील विविध भागात भातशेती चांगली बहरली असून शेती पिकण्याच्या वाटेवर आहे. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत भातशेती कापणी आणि मळणीसाठी तयार होणार आहे.

कापणीच्या वेळी वरुणराजाने कृपादृष्टी केली तर यंदा भात पीक चांगले मिळणार, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. कृषी खात्यालाही तसा विश्वास आहे.

डिचोली विभागीय कृषी कार्यालयाच्या कक्षेत साळ, धुमासे, मेणकूरे, मये, पिळगाव, बोर्डे, अडवलपाल आदी भागात मिळून यंदा जवळपास ६०० हेक्टर शेतजमीन भात लागवडीखाली आली आहे. यंदा भात लागवडीसाठी झालेला

उशीर तसेच जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने घातलेला धुमाकूळ यामुळे यंदा भातशेती धोक्यात येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र जुलै महिन्यातील संकटानंतर भात शेतीला पोषक वातावरण निर्माण झाले.

आता भातशेती कणसांनी चांगली बहरली आहे. अलीकडेच काही दिवस सतत पाऊस पडला तरी त्याचा भात शेतीवर विशेष परिणाम झालेला नाही, अशी माहिती शेतकऱ्यांसह कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

हवामान संतुलित राहिले आणि पावसाची कृपा झाली तर यंदा भाताचे उत्पन्न वाढणार. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निश्चितच हास्य फुलणार आहे.

- दत्तप्रसाद जोग, विभागीय कृषी विस्तार अधिकारी

जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने धुमाकूळ घातला. तरव्याची नासाडी झाली. त्यामुळे यंदा बहरण्यापुर्वीच भातशेती धोक्यात येणार असल्याचे संकेत मिळाले होते. पाऊस ओसरताच काही शेतकऱ्यांनी तरव्याची नव्याने लागवड केली.

अजून तरी शेतकऱ्यांना कष्टाचे फळ मिळण्याची आशा आहे. भाताच्या कापणी आणि मळणीवेळी पावसाने कृपादृष्टी केली तर यंदा भाताचे उत्पन्न वाढणार अशी आशा आहे.

-विश्वास चोडणकर, शेतकरी, मये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT