Goa Politics: गोवा टीएमसीचे संयुक्त संयोजक समील वळवईकर यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचे (टीएमसी) राष्ट्रीय प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांच्यासोबत पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत पेडणे तालुक्याच्या झोनिंग प्लॅनसाठी सल्लागाराला दिलेले कंत्राट रद्द करण्याची आणि झोनिंग प्लॅन रद्द करण्याची मागणी केली.
गोवा टीएमसीचे संयुक्त संयोजक समील वळवईकर यांनी ११ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या ‘गोवा शहर आणि नगर नियोजन बोर्डा’च्या १८३व्या बैठकीत, ज्यामध्ये सरकारने संपूर्ण पेडणे तालुक्यासाठी झोनिंग प्लॅन तयार करण्याची शिफारस केली होती, त्याचा संदर्भ देताना असे सांगितले की, पेडणे हा १२ पैकी पहिला असा तालुका आहे. ज्यात १.४ कोटी चौरस मीटर जमिनीवर २१% हरित आवरण आहे.
या जमिनीवर आलिशान प्रकल्पांसाठी रूपांतरित करण्यासाठी नजर ठेवली गेली आहे. पेडणे तालुक्यातील एकूण २५.२ कोटी चौरस मीटर क्षेत्रापैकी, प्रादेशिक योजना-२०२१ मध्ये २.९ कोटी चौरस मीटरचे वस्ती क्षेत्र म्हणून वर्गीकरण करण्यात आले असून, त्यात ६.८ कोटी चौरस मीटर हरित आवरण म्हणून संरक्षित होते.
तृणमूल काँग्रेस पक्षाचे (टीएमसी) राष्ट्रीय प्रवक्ते ट्रोजन डिमेलो म्हणाले, प्रादेशिक आराखडा-२०२१ मध्ये ‘सुधारणा’च्या नावाखाली कलम १६(बी) आणि १७(२) जोडून टीसीपी कायदे बदलण्यात आले.
पेडणेकरच खरे तज्ज्ञ : झोनिंग योजनेमध्ये मतांचा अधिकार असलेले खरे तज्ज्ञ हे पेडणेकर असताना सल्लागारावर करोडो रुपये का खर्च केले जातात, असा सवाल डिमेलो यांनी केला. हे पाहता सल्लागाराचा करार तत्काळ रद्द करून झोनिंग योजना रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.