Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim: डिचोली 'राधाकृष्ण'मध्ये पोषक आहारावर कार्यशाळा उत्साहात; डिचोली रोटरी क्लबतर्फे आयोजन, प्रश्नमंजूषा स्पर्धेलाही प्रतिसाद

Bicholim News: पूज्य साने गुरुजी ज्ञानोपासना मंदिर संचालित डिचोलीच्या राधाकृष्ण विद्यालयात पोषक आहारावर आधारीत सहा दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: पूज्य साने गुरुजी ज्ञानोपासना मंदिर संचालित डिचोलीच्या राधाकृष्ण विद्यालयात पोषक आहारावर आधारीत सहा दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. डिचोली रोटरी क्लब आणि नेस्ले इंडियाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या शिबिरात २०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

कार्यशाळेचा समारोप शाळेच्या सभागृहात झाला. संस्थेचे अध्यक्ष विद्याधर शिरोडकर, उपाध्यक्ष यशवंत गावस, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य नारायण नाईक, रोटरी क्लबचे उपाध्यक्ष उदय सरदेसाई, सदस्य डॉ. ज्योती सावंत, स्मिता म्हार्दोळकर, संतोषी नाईक, मुख्याध्यापिका वर्षा धुपकर तसेच कार्यशाळेचे प्रशिक्षक उपस्थित होते.

कार्यशाळेतून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग जीवन चांगले घडवण्यासाठी केले पाहिजे, असे प्रतिपादन विद्याधर शिरोडकर यांनी यावेळी बोलताना केले.

साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा धुपकर यांनी स्वागत केले. कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: म्हापसा परिसरात मान्सूनपूर्व नालेसफाईला वेग! एकूण खर्च रु.60 लाख, आतापर्यंत 65 टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण

Goa Fuel Price Hike: महागाईच्‍या 'झळा'; गोमंतकीय जनतेला 'कळा'! इंधन दरवाढीचा फटका; दुधानंतर खाद्यतेल, भाज्‍या, फळे, फुलांच्‍या किमतीतही वाढ

Surya Gochar 2026: अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव अन् घरात आनंदाचे वातावरण, 'सूर्य गोचर' ठरणार वरदान; 3 राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Panaji Tobacco Raid: पणजीत तंबाखूविरोधी धडक मोहीम; 13 गुन्हे दाखल, छुपी विक्री उघड; 3 हजारांचा दंड वसूल

Crime News: आधी शॉक दिला, मग पाजलं विष! अनैतिक संबंधाआड येणाऱ्या नवऱ्याचा बायकोनं काढला काटा; सख्खी बहीण अन् तिचा बॉयफ्रेंडही कटात सामील

SCROLL FOR NEXT