Bicholim Police Station Dainik Gomantak
गोवा

Bicholim Police Station: अभिमान! डिचोली स्थानक देशात पाचव्या क्रमांकावर; उत्कृष्ट पोलिस स्थानकांमध्ये निवड Watch Video

Bicholim Police Station Award: केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाच्या एका पथकाने गेल्या सप्टेंबर महिन्यात स्वतंत्रपणे देशभरातील पोलिस स्थानकांच्या कामगिरीचे सर्वेक्षण केले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: गुन्ह्यांचा तपास आदी कामगिरीच्या जोरावर डिचोली पोलिस ठाण्याने उत्कृष्ट पोलिस स्थानकांमध्ये देशात पाचवा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाच्या एका पथकाने गेल्या सप्टेंबर महिन्यात स्वतंत्रपणे देशभरातील पोलिस स्थानकांच्या कामगिरीचे सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणाअंती या पथकाने देशभरातील मिळून दहा उत्कृष्ट पोलिस ठाण्यांची निवड केली आहे.

त्यात डिचोली पोलिस ठाण्याला पाचवे स्थान प्राप्त झाले आहे. हा मान मिळविणारे डिचोली पोलिस ठाणे राज्यातील एकमेव ठरले आहे. गेल्या सहा महिन्यात अमलीपदार्थ, अपहरण, लैंगिक अत्याचार आदी विविध गुन्ह्यांचा तपास करण्यात आणि

गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात आलेले यश, चाइल्ड फ्रेंडली रूम, जीम आदी उपलब्ध केलेल्या दर्जात्मक सुविधा या निकषावर डिचोली पोलिस स्थानकाची उत्कृष्ट पोलिस स्थानकांमध्ये निवड करण्यात आली आहे.

उत्तर गोव्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक राहूल गुप्ता, पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. आणि पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या संयुक्त प्रयत्नाने ही यशस्वी कामगिरी केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील या पुरस्कारामुळे गृह खाते आणि गोवा पोलिसांसाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.

या ठाण्यांची बाजी

दिल्लीच्या गाझीपूर पोलिस स्थानकाची प्रथम स्थानी, पहरगाव (अंदमान आणि निकोबार) आणि रायचूर-कर्नाटकमधील पोलिस स्थानकाची अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थानी निवड झाली आहे. झारखंडमधील चौका पोलिस स्थानकाची चौथ्या स्थानी निवड झाली आहे. मेघालय, तेलंगणा, पोंडीचेरी, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यातील पोलिस स्थानकांची उत्कृष्ट दहामध्ये निवड झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धक्का लागताच मेट्रोत दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, केस ओढत एकमेकींना बदडले; व्हायरल व्हिडिओ पाहून यूजर्स म्हणाले, 'रिअ‍ॅलिटी शो पेक्षाही डेंजर'

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! गोव्यात विद्यार्थ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित; बस चालकांसाठी 'पोलीस व्हेरिफिकेशन' बंधनकारक

Surya Gochar 2026: 11 जानेवारीपर्यंत सूर्य देवाची विशेष कृपा! 'या' 3 राशींच्या नशिबात राजयोग; सोन्यासारखे चमकतील दिवस!

Konkan Tourism: गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणातील 'ही' 5 शांत ठिकाणं आहेत बेस्ट

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

SCROLL FOR NEXT