Laterite Stone Theft Dainik Gomantak
गोवा

Laterite Stone Theft: मयेतील खाणीमध्ये जांभा दगडाच्या चोरीप्रकरणी 4 जणांना अटक; डिचोली पोलिसांची कारवाई

Kavya Powar

Laterite Stone Theft: मये इथल्या एका चिरेखाणीमध्ये जांभा दगडाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती डिचोली पोलिसांना मिळाली. काहीजण खाणीत चिरा दगडाची चोरी करून ते ट्रकमध्ये भरून नेत होते. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणात अजून एकाचा समावेश असून पाचव्या आरोपीला पोलीस अद्याप अटक करू शकले नाहीत. संदीप जोवारी लकारा, महाबीर लक्ष्मण राम, लालदेव लक्ष्मण राम हे आरोपी सध्या मयेमध्येच वास्तव्यास आहेत. तर ट्रक चालक मुकुंद वसंत केरकर आणि अमर तुयेकर अशी आरोपींची नावे आहेत.

दरम्यान, पोलिसांनी इलेक्ट्रिक मोटार, कटिंग मशीन ब्लेड, दोन जनरेटर आणि एक पॉवर टिलर बसवलेले कटिंग मशीन ताब्यात घेतले आहे. आरोपींना आयपीसी, खाण आणि खनिज (विकास आणि नियमन कायदा) 1957 च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई; निकृष्ट काजू आणि बेकायदेशीर सिगारेट जप्त!

Goa Sunburn: सनबर्नच्या 100 कोटी मानहानीच्या दाव्यावर पार पडली सुनावणी; काय म्हणाले कोर्ट वाचा

Mapusa: 35 अनधिकृत बांधकामांवर पुन्हा चालला बुलडोझर; करासवाडा जंक्शन येथे पालिकेची कारवाई

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर कुटुंबियांसह रात्रीचा प्रवास सुरक्षित आहे का? काय सांगतात प्रवासी

Digital Arrest पद्धतीने अहमदाबादच्या महिलेची पाच लाखांची फसवणूक; CBI अधिकारी असल्याचा केला दावा

SCROLL FOR NEXT