Plastic Awareness :  Dainik Gomantak
गोवा

Plastic Awareness : नगरसेवकाकडून जनजागृती! डिचोलीत प्लास्टिकमुक्तीचा संदेश

Plastic Awareness : त्यांच्यासह डिचोलीतील एक ज्येष्ठ नगरसेवक विजयकुमार नाटेकर हेसुद्धा बाजारात फिरत होते. बाजारात फिरताना मात्र नगरसेवक नाटेकर प्लास्टिक विरोधात जनजागृती करत होते. '

गोमन्तक डिजिटल टीम

Plastic Awareness : डिचोली, एका बाजूने लक्ष्मीपूजनाचा उत्साह, तर दुसऱ्या बाजूने या उत्सवाची संधी साधून डिचोलीत एका नगरसेवकाकडून बाजारात चक्क आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्लास्टिक विरोधात जनजागृती करण्यात आली.

काल (रविवारी) सायंकाळपासून डिचोली शहरात सर्वत्र लक्ष्मीपूजनोत्सवाचा उत्साह संचारला होता. लक्ष्मीपूजनानिमित्त बालगोपाळ आदी भाविक बाजारात फिरून दुकाने आणि अन्य आस्थापनांनी जाऊन चिरमुऱ्या आदी प्रसाद गोळा करीत होते.

त्यांच्यासह डिचोलीतील एक ज्येष्ठ नगरसेवक विजयकुमार नाटेकर हेसुद्धा बाजारात फिरत होते. बाजारात फिरताना मात्र नगरसेवक नाटेकर प्लास्टिक विरोधात जनजागृती करत होते. ''माका नाका प्लास्टिक'' असे घोषवाक्य लिहिलेली कापडी पिशवी गळ्यात घालून ते बाजारात फिरत होते. ''स्वस्थ भारत'' असे घोषवाक्य लिहिलेली कापडी पिशवीही त्यांच्या हातात होती.

त्यांनी या पिशव्यांतून चिरमुऱ्याही गोळा करताना सर्वांना पर्यावरण जतनाचा संदेश दिला. गेल्या वर्षीपासून लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून मी पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती करीत आहे, असे विजयकुमार नाटेकर यांनी सांगितले.

प्लास्टिकचा वापर आरोग्यास हानिकारक असून, पर्यावरण संतुलनावरही त्याचा अनिष्ट परिणाम होत आहे. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने याचा विचार करुन प्लास्टिकचा वापर टाळणे आवश्यक आहे. त्यासाठी संधी मिळेल तेव्हा प्लास्टिक विरोधात जागृती आवश्यक आहे. प्लास्टिकचे दुष्परिणाम ओळखून आजच्या पिढीने प्लास्टिकपासून दूर रहावे. शहर प्लास्टिकमुक्त व्हावे. यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा.

- विजयकुमार नाटेकर, नगरसेवक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT