Bicholim School Pepper Spray News Dainik Gomantak
गोवा

...ई-सिगारेट माझ्या बॅगेत कुठून आल्या माहित नाही! डिचोली पेपर स्प्रे प्रकरणात नवा ट्विस्ट

श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रकरणाची चौकशी सुरूच; अफवांना ऊत

दैनिक गोमन्तक

विनायक सामंत

Bicholim School Pepper Spray News: डिचोली येथील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात घडलेल्या कथित पेपर स्प्रे प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळालेली आहे. हा प्रकार नक्की पेपर स्प्रे मुळे घडलाय की अजून काही वेगळे कारण आहे हे अजून समोर आलेले नाहीये. व्यवस्थापन समिती याबाबत काय करत आहे याचा जबाब पालक शनिवारी होणाऱ्या बैठकीत विचारणार आहेत.

याप्रकरणी गोवा राज्य शिक्षण खात्याने विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीला ३ दिवसांत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर समितीने कडक कारवाई करत ५ संशयित विद्यार्थ्यांना निलंबित करून, आपण लगेच कारवाई केली, असे भासविण्याचा प्रयत्न केला असल्याचे निलंबित केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे म्हणणे आहे.

चौकशीदरम्यान ज्या विद्यार्थिनीच्या बॅगेत ई-सिगरेट सापडली, त्याचा या प्रकरणाशी कितपत संबंध आहे याची देखील रीतसर तपासणी होण्याची गरज आहे. दैनिक गोमंतकला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ह्या प्रकरणात ई-सिगारेटचा कुठेच वापर झालेला दिसून येत नाही.

आठवडा उलटला तरीही चौकशी सुरूच आहे. समितीचा अहवाल अजून शिक्षण खाते आणि पोलिसांकडे पोहोचलेला नाहीये. त्यातच सुरू असलेल्या अफवांमुळे विद्यार्थीवर्ग आणि पालक दोन्ही दबावाखाली आहे.

मागच्या गुरुवारी सकाळी पावणे बाराच्या दरम्यान ही घटना घडली. मध्यांतरची सुट्टी संपल्यावर शिक्षिका वर्गामध्ये शिकवत असताना शेवटच्या रांगेत बसलेल्या मुलींना अचानक खोकला सुरू झाल्याने आणि नंतर श्वास घेण्यास त्रास व्हायला लागल्याने त्यांना बाहेर नेण्यात आले.

डिचोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारादरम्यान विद्यार्थिनींना जास्त त्रास होऊ लागल्याने काहींना म्हापसा उत्तर गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तिथे उपचारादरम्यान मुलींना पेपर स्प्रे मुळेच त्रास झाल्याचे सांगण्यात आले.

ई-सिगारेट आपल्या बॅगेत कुठून आल्या?

ई-सिगारेट सापडलेल्या विद्यार्थिनीने गोमंतकशी बोलताना सांगितले की, ज्यावेळी आपल्या बॅगेत ई-सिगारेट सापडली त्यावेळी आपण इतर मुलींसोबत हॉस्पिटलमध्ये त्यांचा मदतीसाठी होते. त्यामुळे ई-सिगारेट आपल्या बॅगेत कुठून आल्या ते आपण सांगू शकत नाही आणि आता या प्रकारात आपले नाव घेतले जात आहे.

शनिवारी मुलांच्या प्रथम चाचणीचा निकाल घेण्यासाठी पालकांना बोलावण्यात आले आहे. त्यावेळी होणाऱ्या बैठकीत या प्रकरणाची चौकशी आणि निकाल कुठपर्यंत पोहोचला आहे याबाबत पालक विचारणा करणार असल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT