Goa Pay Parking Dainik Gomantak
गोवा

Bicholim: डिचोलीतील ‘पे पार्किंग’ प्रस्ताव अजूनही घुटमळतोय! कंत्राटदार कंपनीचा प्रतिसाद नाही; पालिकेसमोर प्रश्नचिन्ह

Bicholim Pay Parking: डिचोली शहरात दिवसेंदिवस पार्किंग समस्या गंभीर बनत असून, पालिकेच्या प्रलंबित ‘पे-पार्किंग’ प्रस्तावाला चालना कधी मिळणार, त्याची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

Sameer Panditrao

डिचोली: डिचोली शहरात दिवसेंदिवस पार्किंग समस्या गंभीर बनत असून, पालिकेच्या प्रलंबित ‘पे-पार्किंग’ प्रस्तावाला चालना कधी मिळणार, त्याची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

दरम्यान, ‘पे पार्किंग’संबंधीची निविदा स्वीकारण्यास कंत्राटदार कंपनी पुढे येत नसल्याने हा प्रस्ताव घुटमळत पडला आहे, अशी माहिती मिळाली आहे. बेशिस्त पार्किंगवर आळा आणण्यासाठी शहरात ‘पे पार्किंग’ सुरू करण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे. पालिकेच्या या प्रस्तावाला उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यताही मिळाली आहे. शहरात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या बिकट बनत चालली आहे.

शहरातील वाढत्या आणि बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणण्यासाठी ‘पे पार्किंग’ सुरू करण्याचा डिचोली पालिकेचा प्रस्ताव आहे. तीन वर्षांपूर्वी वाहतूक पोलिस विभागासह डिचोली पाकिकेने शहरातील पालिका कार्यालय इमारतीसमोरील रस्ता, बाजार, जुने बसस्थानक आदी काही भागातील जागांची पाहणी करून पार्किंग कोठे आणि कशा पद्धतीने शक्य आहे, त्याची चाचपणी केली होती.

पालिका मंडळाच्या बैठकीत पार्किंग शुल्कही निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, अजून तरी या प्रस्तावाला चालना मिळालेली नाही.

शहरात वाहनांचे पार्किंग करताना बेशिस्तपणाही वाढत आहे. या गोष्टींचा विचार करून शहरात ‘पे पार्किंग’ योजना सुरू करण्याचा पालिकेचा विचार आहे. ‘पे पार्किंग’ कोठे व कसे करता येईल, त्याचा अंदाज घेण्यात आला आहे. काही जागांची पाहणीही केली आहे. ‘पे पार्किंग’ची संकल्पना प्रत्यक्षात आली, तर पार्किंगमध्ये शिस्त येईल आणि पालिकेच्या महसुलातही वाढ होणार आहे.

- विजयकुमार नाटेकर, नगराध्यक्ष, डिचोली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT