Bicholim Municipality Dainik Gomantak
गोवा

Bicholim Municipality :थकबाकी वसुलीसाठी मोहीम ; डिचोली पालिकेचा निर्णय

थकबाकी वसूल करण्यासाठी कडक पावले उचलण्याचा निर्णय आज (गुरुवारी) झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Municipality : डिचोली, घरपट्टी आणि भाड्याच्या रुपाने डिचोली पालिकेला जवळपास ५.३८ कोटी रुपयांचा महसूल येणे बाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी कडक पावले उचलण्याचा निर्णय आज (गुरुवारी) झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

नियोजित आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला डिचोली पालिकेचे समर्थन असून, ते म्हावळिंगेतच झाले पाहिजे, अशी मागणीही बैठकीत पुढे आली. भटकी गुरे आणि कुत्री, कचरा समस्या, अस्वच्छता आदी विषयांवरही चर्चा होऊन ठोस कृती करण्याचे ठरविण्यात आले.

मुख्याधिकारी सचिन देसाई आणि नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ वाजता सुरू झालेली बैठक दुपारी २.१५ वाजेपर्यंत चालली.

या बैठकीस उपनगराध्यक्ष सुखदा तेली, राजाराम परब, विजयकुमार नाटेकर, रियाज बेग, सुदन गोवेकर, अनिकेत चणेकर, नीलेश टोपले, गुंजन कोरगावकर, तनुजा गावकर, ॲड. अपर्णा फोगेरी, दीपा पळ, ॲड. रंजना वायंगणकर आणि दीपा शिरगावकर हे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

घरपट्टी, दुकाने आणि सरकारी आस्थापनांकडून मिळून पालिकेला ५.३८ कोटी रुपये महसूल येणे आहे. संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी देसाई यांनी दिली.

ही थकबाकी वसूल करण्यासाठी समिती नेमून कठोर पावले उचलावीत. गरज पडलीच तर वीज आणि पाण्याची जोडणी तोडावी, असा विचार नगरसेवकांनी मांडला. सरकारी आस्थापनांकडून थकबाकी वसूल कशी करावी, यावरही चर्चा करण्यात आली.

बेशिस्त, कामचुकार कामगारांवर कारवाई करा

आजच्या बैठकीत पालिकेच्या सफाई कामगारांच्या बेशिस्तपणाचा विषय चर्चेला आला. कामचुकार कामगारांवर कारवाई करा, कामगारांना गणवेष सक्तीचा करा, अशी मागणी अनिकेत चणेकर यांनी केली.

ॲड. अपर्णा फोगेरी यांनी बाजारातील ‘फूड कोर्ट’ परिसरातील अस्वच्छतेकडे लक्ष वेधून, त्‍यामुळे डेंग्यूचा फैलाव होत आहे असा मुद्दा उपस्थित केला. बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली.

अन्य काही विषयांवरही चर्चा करण्यात आली. त्‍यात दीपा पळ, नीलेश टोपले, विजयकुमार नाटेकर, अनिकेत चणेकर, गुंजन कोरगावकर, सुदन गोवेकर आदींनी सहभाग घेतला.

क्रिकेट स्टेडियमला सर्व नगरसेवकांचा पाठिंबा

नियोजित आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम डिचोली शहरापासून जवळच असलेल्‍या म्हावळिंगे येथेच व्हायला हवे, अशी मागणी नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांनी केली.

या मागणीला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दर्शविला. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांचेही त्‍यास समर्थन आहे.

विहिरीजवळच बांधली सेप्‍टिक टाकी

डिचोली नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग ३ मधील एका सार्वजनिक विहिरीला टेकून स्वच्छतागृहाची सेप्‍टिक टाकी बांधण्यात आली आहे.

यामुळे विहिरीचे पाणी दूषित होण्याचा धोका आहे, असा मुद्दा सुखदा तेली यांनी उपस्थित केला. हा विषय लोकायुक्तांकडे जाण्यापूर्वी ठोस कारवाई करा, अशी मागणीही त्‍यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT