CM Pramod Sawant | Sadanand Shet Tanawade Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: जनतेच्या आरोग्याबाबत सरकार गंभीर; मोबाईल मेडिकल बस 'दीनदयाळ'कडे सुपूर्द

Pramod Sawant: गोव्यातील जनतेच्या आरोग्याबाबत सरकार कटीबद्ध आहे.

दैनिक गोमन्तक

Bicholim: जनतेच्या आरोग्याबाबत सरकार गंभीर आहे. तरीदेखील प्रत्येकाने वेळोवेळी तपासणी करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोलीत बोलताना केले.

दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानला देण्यात आलेल्या ''मोबाईल मेडिकल युनिट बस'' आणि स्कूल व्हॅनच्या हस्तांतरण सोहळ्यात मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. ''सीआरएस'' उपक्रमांतर्गत ब्लॅक व्हीच कंपनीने मोबाईल मेडिकल युनिट बस, तर कॅनरा बँकेने स्कुल व्हॅन दीनदयाळ प्रतिष्ठानला दिली आहे.

20 डिसेंबरला आयोजित हस्तांतरण सोहळ्याप्रसंगी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, ब्लॅक व्हीच कंपनीचे सहयोगी उपाध्यक्ष ब्रम्हेद्र ठाकूर, कॅनरा बँकेचे सरव्यवस्थापक राम नाईक, नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वल्लभ साळकर, उपाध्यक्ष कांता पाटणेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटणेकर तसेच अन्य संचालक उपस्थित होते.

दीनदयाळ प्रतिष्ठानचे संचालक मंडळ निःस्वार्थी भावनेने काम करीत आहे, असे गौरवोद्‍गार सदानंद शेट तानावडे यांनी काढले. ब्रम्हेद्र ठाकूर आणि राम नाईक यांनी ''सीआरएस'' उपक्रमाविषयी माहिती दिली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते मोबाईल मेडिकल युनिट बस आणि स्कुल व्हॅनचे पूजन करण्यात आले. यावेळी ब्रम्हेद्र ठाकूर, राम नाईक, अंताजी दुभाषी आदी मान्यवरांचा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

समाजोपयोगी कार्य

डॉ. शेट्ये यांनी दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानच्या कार्याची प्रशंसा केली. आपल्या आरोग्याबाबतीत कोणीच निष्काळजीपणा दाखवता कामा नव्हे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रेमेंद्र शेट यांनी दिनदयाळ जनसेवा प्रतिष्ठान समाजोपयोगी कार्यात अग्रेसर असल्याचे मत व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT