Bicholim Market Complex Leakage Dainik Gomantak
गोवा

Bicholim Market Leakage: पावसाळा आला की व्यापाऱ्यांची कसरत; डिचोली बाजार संकुलातील गळतीची समस्या अजूनही कायम!

Bicholim Market Complex Leakage: पावसाच्या सुरुवातीलाच संकुलात ठिकठिकाणी पाणी गळू लागल्याने विक्रेते आणि दुकानदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: डिचोलीतील बाजार संकुल प्रकल्पाला लागलेली गळतीची समस्या यंदाही कायम राहिली असून, पावसाच्या सुरुवातीलाच संकुलात ठिकठिकाणी पाणी गळू लागल्याने विक्रेते आणि दुकानदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

बाजार संकुलाच्या छपराची अवस्था कमकुवत झाल्याने गेल्या चार वर्षांपासून पावसाळ्यात गळतीची समस्या उद्भवत आहे. यापूर्वी पालिकेकडून छपरावरील पत्र्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे गळतीपासून मुक्ती मिळेल, अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नाही. गळती सुरूच आहे.

ताडपत्रीचा आधार!

गळतीपासून बचाव करण्यासाठी विक्रेत्यांना दुकानांमध्ये बादल्या ठेवाव्या लागत आहेत. काही जण छत्रीचा आधार घेत व्यवसाय करत असून, अनेकांनी प्लास्टिक, ताडपत्री बांधून व्यवस्था केली आहे. मात्र वरच्या मजल्यावरील दुकानदारांना अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT