Bicholim Katarwada road dispute Dainik Gomantak
गोवा

Bicholim: डिचोली-कातरवाडा रस्ता वाद चिघळणार, ग्रामस्थ संतप्त; रस्त्यासाठी जमीन देण्यास गावकरांचा ठाम नकार

Bicholim Katarwada road dispute: डिचोलीच्या आयडीसी परिसरातील कातरवाडा येथील रस्त्याचा वाद आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: डिचोलीच्या आयडीसी परिसरातील कातरवाडा येथील रस्त्याचा वाद आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

रस्त्यासाठी दावा करण्यात येत असलेली मालमत्ता ही आमच्या पूर्वजांनी राखून ठेवलेली शेतजमीन आहे. रस्ता झाला नाही, तर आंदोलन करण्याची धमकी देणाऱ्यांना आम्ही भीक घालत नाही, असे गावकरांनी सांगून, कोणाला काय करायचे ते करा.

मात्र रस्त्यासाठी आमची एक इंचही जागा सोडणार नाही, असे श्यामू गावकर, लक्ष्मीकांत परब, निकिता गावकर, माधवी परब आदी ग्रामस्थ गावकरांच्या गटाने स्पष्ट केले आहे. कातरवाडा येथे रस्ता व्हावा, अशी त्या परिसरात राहणाऱ्या लोकांची आहे.

२५ हून अधिक ग्रामस्थ गावकर उपस्थित होते. सध्या जी जमीन ओसाड दिसत आहे, ती आमची शेतजमीन आहे. आम्हीही शेती करण्याचा निर्णय घेतला आहे, असे माधवी परब हिने सांगितले.

‘वर्क ऑर्डर’ कशी?

रस्त्यासाठी आम्ही कोणीच ‘ना हरकत’ दाखला दिला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे वर्क ऑर्डर कशी काढण्यात आली, असा प्रश्न लक्ष्मीकांत परब, माधवी परब आदींनी उपस्थित केला. मालमत्ता आमची आहे. तेव्हा रस्त्यासाठी कोणी धमकी दिली, तर त्याला प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा निकिता गावकर हिने दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Marine Export: सागरी निर्यातीत घट, महसुलात वाढ; गोव्यात निर्यातीला मोठा फटका, दरवाढीमुळे एकूण उत्पन्नात वाढ

School textbook shortage: नववीपासूनची पुस्तके अनुपलब्ध; विद्यार्थी, पालक चिंतेत; चौकशीसाठी दुकानांवर गर्दी

Omkar Elephant: ओंकार हत्ती पुन्हा गोव्यात, बंदोबस्त करणार कोण? गोवा वन खात्याच्या अधिकाऱ्यांचा प्रस्ताव नेतर्डेवासीयांनी धुडकावला

युरोपमधून कुरियरने गोव्यात ड्रग्स; जेलमधील पेडलर्सचा खुबीने वापर, गोव्यातील काही टॅक्‍सीचालकही होते सूत्रधाराच्या पे-रोलवर

Horoscope: महादेवाच्या कृपेने सोमवार ठरणार फलदायी; 'सिद्धी योग' आणि 'अनुराधा नक्षत्रा'चा 5 राशींना मोठा लाभ!

SCROLL FOR NEXT