Bicholim Kadamba Bus Stand Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: डिचोली बसस्थानकासाठी मजुरांचा जीव धोक्यात! अनर्थ घडण्यापूर्वीच हा प्रकार थांबवण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: शहरातील नियोजित अत्याधुनिक ''कदंब'' बसस्थानकाच्या कामाला गती मिळाली असली, तरी मजूरवर्गाकडून मात्र अक्षरशः जीव मुठीत धरून काम करण्यात येत असल्याचे आढळून येत आहे. सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक ती काळजी न घेता धोका पत्करून मजूर काम करीत आहेत.

या प्रकाराबाबत अनेकजण चिंता तेवढीच भीती व्यक्त करत आहेत. मजुरांबाबतच्या या निष्काळजीपणाकडे संबंधित कंत्राटदार किंवा अन्य यंत्रणांचे लक्ष जात नसल्याबद्धल अनेकजण आश्चर्यदेखील व्यक्त करीत आहेत. एखादा अनर्थ घडण्यापूर्वीच संबंधितांनी हा धोकादायक प्रकार थांबवावा,अशी मागणी होत आहे.

बसस्थानक प्रकल्पाचे ''रुफ'' बसविण्याचे काम सध्या चालू आहे. जमिनीपासून साधारण तीस मीटर उंचावर ''रुफ'' घालण्यात येत आहे. मात्र संबंधित मजूर सुरक्षेची काळजी न घेता निष्काळजीपणे हे काम करताना आढळत आहेत.

गोवा

सुरक्षेची काळजी घ्या!

सुरक्षेची काळजी घेण्यास दुर्लक्ष झाल्याने यापूर्वी अन्य भागात मिळून काही बांधकाम प्रकल्पस्थळी दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेची काळजी न घेता उंचावर काम करणे धोक्याचे आहे. बसस्थानक प्रकल्पस्थळी एखादी अनुचित घटना टाळण्यासाठी संबंधितांनी याकडे लक्ष घालून मजुरांना सुरक्षेच्यादृष्टीने काळजी घेण्याची ताकीद द्यावी, अशी मागणी नझीर बेग आणि इतरांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात पुन्हा दाणादाण! जोराचे वारे आणि विजांचा कडकडाट; काही ठिकाणी 24 तास बत्ती गुल

Saint Francis Xavier: सेंट फ्रान्सिस झेवियरचा केला होता ‘भारतातील महान पुरुष’ असा गौरव! पहिले टपाल तिकीट कधी?

Aquem News: आके येथे घरावर झाड पडून बरेच नुकसान

Margao News: कंत्राटदार मिळेना, खर्चावरून गोंधळ, बागेत कॉफी शॉप; मडगाव पालिकेची सभा ठरली वादळी

Buimpal Accident: वळणावर गुरे आडवी आल्याने वाहनचालकाचा ताबा सुटला! भुईपाल येथे टेंपो भिंतीवर जाऊन आदळला

SCROLL FOR NEXT