Bicholim Fraud  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: नोकरीचे आमिषाने कोटींचा चुना लावलेली संशयित महिला महाराष्ट्रात?

Bicholim Scam: प्रिया नाईक हिच्या विरोधात पोलिसांनी ‘भादंसं’च्या ४२० कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना कोटींचा चुना लावलेली प्रिया नाईक ही संशयित अजून फरारी असून, ती महाराष्ट्रात पळून गेल्याचा संशय आहे. पोलिसही तिच्या मागावर असल्याची माहिती मिळाली आहे.

संशयित प्रिया नाईक हिच्या विरोधात पोलिसांनी ‘भादंसं’च्या ४२० कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, या प्रकरणामागील मास्टरमाईंड पोलिस कॉन्स्टेबल रोहन वेंझी याला सेवेतून निलंबित केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस चौकशी दरम्यान पोलिस कॉन्स्टेबल वेंझी याने संशयित महिलेला मदत केल्याचे आढळून आले असून, संशयित महिलेने वेंझी याच्या खात्यात रक्कम जमा केल्याचे उघड झाले आहे.

प्रिया नाईक या संशयित महिलेने केवळ नोकरीचेच आमिष दाखवून नव्हे, तर कधी मुलीवर तर कधी स्वतःच्या आईवर शस्त्रक्रिया करण्याचे कारण सांगून पैसे उकळल्याचे समजते. संशयित महिलेची मुलगी तालुक्यातील एका खासगी शाळेत शिकत होती. त्या शाळेतून मुलीचे नाव काढताना तिने आपण मुलीसह आपल्या गावी कोल्हापूर येथे जात असल्याचे कारण दिल्याचे समजते. महिलांसह अनेकांना गंडा घातलेली संशयित ठक महिला अजून पोलिसांना सापडत नसल्याने तिच्या आमिषाला बळी पडलेल्यांची चिंता वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT