Goa Crime: दोन वर्षांपासून फरार असलेल्या ‘हिस्ट्रीशीटर’ सतीश गावसला अटक; मुंबई विमानतळावर कारवाई

History Sheeter: सतीश गावस विरोधात पोलिस स्थानकात नऊ गुन्ह्यांची नोंद; तसेच ‘एनआय’ कायद्याच्या १३८ कलमाखाली त्याच्या विरोधात ;न्यायालयात खटले चालू होते
Hisstory Sheeter: सतीश गावस विरोधात पोलिस स्थानकात नऊ गुन्ह्यांची नोंद; तसेच ‘एनआय’ कायद्याच्या १३८ कलमाखाली त्याच्या विरोधात ;न्यायालयात खटले चालू होते
History Sheeter Arrest Canva
Published on
Updated on

Goa Crime Update

डिचोली: अनेक गुन्ह्यांत डिचोली पोलिसांना हवा असलेल्या आणि मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अखेर अटक करण्यात यश मिळाले आहे. सतीश गावस (रा. साखळी) असे या हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराचे नाव आहे.

दुबईहून परतताना मुबंई विमानतळावर या सराईत गुन्हेगाराला अटक केली. मुंबई विमानतळ प्राधिकरणाच्या सहकार्याने डिचोली पोलिसांनी ही कारवाई केली. संशयित गुन्हेगार सतीश गावस याला रिमांडसाठी सोमवारी (ता.२६) डिचोलीच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे,अशी माहिती मिळाली आहे.

सतीश गावस विरोधात पोलिस स्थानकात विविध नऊ गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच ‘एनआय’ कायद्याच्या १३८ कलमाखाली त्याच्या विरोधात वेगवेगळ्या न्यायालयात खटले चालू होते. मात्र, संशयित गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. पोलिस त्याच्या मागावर होते. सतीश गावस याच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले होते.

Hisstory Sheeter: सतीश गावस विरोधात पोलिस स्थानकात नऊ गुन्ह्यांची नोंद; तसेच ‘एनआय’ कायद्याच्या १३८ कलमाखाली त्याच्या विरोधात ;न्यायालयात खटले चालू होते
Goa Crime: पार्किंगच्या वादातून हवेत गोळीबार! नेमबाजी स्पर्धेतील प्रशिक्षकाचे कृत्य

सापळा रचून अटक

हिस्ट्रीशीटर सतीश गावस हा गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. तो विदेशात पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सतीश गावस हा दुबईहून गोव्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल आणि डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर, पोलिस उपनिरीक्षक अमरनाथ पाळणी यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने ही कारवाई केली. मुंबई विमानतळावर सापळा रचून पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या. हिस्ट्रीशीटरला अटक करण्यात यश मिळवल्याबद्दल डिचोली पोलिसांचे कौतुक होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com